छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात त्यांनी जवळपास ३८ वर्षे नोकरी केली. स्लीप बॉय म्हणून त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात केली. ते सर्कल ऑफिसर पदावर असताना सेवानिवृत्त झाले होते. अगदी सुरुवातीच्या काळात कसबा बावडा काँग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. नोकरी करत असतानाच ते दैनिक तरुण भारतचे कसबा बावडा प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. त्यांना अलीकडेच करवीर तालुका पत्रकार संघाच्या करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार (दि.५) रोजी सकाळी साडेआठ वाजता कसबा बावडा येथे आहे.