कोल्हापूर : महापुराने ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. दुर्गम खेडी, वाड्या-वस्त्या या ठिकाणी खरी मदतीची गरज आहे. त्याठिकाणी त्वरित मदत पोहचविण्यासाठी प्राधान्य हवे, असे मत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ.अनिता नेवसे यांनी व्यक्त केले.आश्रमशाळा पळसंबे (ता.गगनबावडा) येथे कौटुंबिक न्यायालय बार असोशिएशन व कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त शाळेला एक हात मदतीचा या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालय बार असोशिएशनचे अध्यक्ष वकील किरण खटावकर होते. महापुराच्या संकटाला खंबीरपणे तोंड देतानाच सामाजिक बांधीलकीची जाणीवही ठेवली पाहिजे, असे सांगून आश्रम शाळेतील मुले व कर्मचारी वृंद यांना स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्याची काळजी व गुणवत्ता वाढीसाठी न्या.डॉ. नेवसे यांनी मार्गदर्शन केले.दुर्गम भागातील अडी-अडचणी जाणून घेऊन त्या सोडविणे आमचे कर्तव्य आहे. शिक्षण हा विकासाचा पाया असून शाळेच्या सर्वांगीण विकासास सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन बार असोशिएशनचे अध्यक्ष खटावकर यांनी दिले.महापुराने झालेल्या नुकसानीत विद्यार्थी वर्गाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची जी हानी झाली आहे ती भरून काढण्यासाठी शाळेला मदत करण्याचे ठरविले असल्याचे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदिप पाटील यांनी सांगितले. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष वकील संजयकुमार गायकवाड, सचिव वकील उमर मुजावर, उदय पडवळ, पत्रकार पंडित सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.पळसंबे आश्रमशाळेस चादर, गाद्या, उशा असे साहित्य माध्यमातून देवून खाऊ वाटप केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागोजी कोळेकर व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व आभार शिक्षक उगलमुगले यांनी केले.
पूरग्रस्त भागात मदत पोहचविण्यास प्राधान्य हवे : अनिता नेवसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 3:59 PM
महापुराने ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. दुर्गम खेडी, वाड्या-वस्त्या या ठिकाणी खरी मदतीची गरज आहे. त्याठिकाणी त्वरित मदत पोहचविण्यासाठी प्राधान्य हवे, असे मत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ.अनिता नेवसे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देपूरग्रस्त भागात मदत पोहचविण्यास प्राधान्य हवे : डॉ. अनिता नेवसेकौटुंबिक न्यायालय बार असोशिएशनतर्फे पूरग्रस्त आश्रमशाळेला मदत