कोल्हापूर : कृषी विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० जूनअखेर आहे. सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ आॅगस्टला महाविद्यालये सुरू होणार आहेत. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर हे कार्यक्षेत्र आहे. उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) या विद्यापीठांच्या कार्र्यक्षेत्रात येतात. राज्यात अनुदानित कृषी महाविद्यालयांत विविध अभ्यासक्रमांना २६२७, तर विनाअनुदानित ११ हजार ७० अशी एकूण १३ हजार ६९७ प्रवेशक्षमता आहे. राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्यास कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुभा आहे. अनुदानित महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास प्रथम सत्राची ११ हजार ३८६, तर विनाअनुदानित महाविद्यालयात ३४ हजार ५०० रुपये अशी फी आहे. दुसऱ्या सत्राची फी अनुदानितला ६ हजार २००, तर विनाअनुदानितला पहिल्या सत्राइतकीच आहे. सन २०१५-१६ शैक्षणिक वर्षासाठी बी. एस्सी. (कृषी), बी. एस्सी (उद्यानविद्या), बी. एस्सी. (कृषी जैवतंत्रज्ञान), बी. टेक. (अन्नतंत्र), बी. बी. ए. (कृषी), बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी. एस्सी. (गृहविज्ञान) पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे केंद्रीय पद्धतीने पुणे केटीपीटलद्वारे आॅनलाईन पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना ६६६.ेूंी१.ङ्म१ॅ & ेंँं-ँ१्रंे्रि२२्रङ्मल्ल.्रल्ल या वेबसाईटवर प्रवेश भरता येणार आहे, इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० जूनप्ांूर्र्वी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन खोत, सहायक कुलसचिव राजेंद्र भुजबळ यांनी केले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील प्रवेश क्षमताकोल्हापूर जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये आणि प्रवेश क्षमता अशी : कोल्हापूर- १९०, जैनापूर (ता. हातकणंगले)- ६०, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, तळसंदे (ता. हातकणंगले)- १२०, रोशनबी शमनजी महाविद्यालय, नेसरी (ता. गडहिंग्लज)- ६०.
कृषी महाविद्यालयात अर्ज भरण्याची ३० जून अंतिम मुदत
By admin | Published: June 18, 2015 12:02 AM