शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

आभाळच फाटलंय, ठिगळं कुठं जोडताय -: ठेकेदारांवर नियंत्रण ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 3:23 PM

कोल्हापूर शहरातील खराब रस्ते, अमृत योजनेतील ड्रेनेजलाईन व जलवाहिनी टाकण्याची रखडलेली कामे, डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धोक्यात आलेले नागरिकांचे आरोग्य या प्रश्नावर मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली.

ठळक मुद्दे शिवसेनेचा आयुक्तांना सवाल

कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीतील सर्वच रस्ते अक्षरश: धुऊन गेले असताना पॅचवर्क करण्याच्या महापालिकेच्या कामावर जोरदार टीका करताना शिवसेनेने मंगळवारी ‘आभाळंच फाटलंय, ठिगळं कुठं जोडताय’ अशा शब्दांत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना सवाल विचारला. रस्त्यांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत, शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, असा आग्रह शिवसैनिकांनी आयुक्तांकडे धरला. ठेकेदारांच्या मनमानीमुळे रस्ते खराब होतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवा, असेही ठणकावून सांगण्यात आले.

कोल्हापूर शहरातील खराब रस्ते, अमृत योजनेतील ड्रेनेजलाईन व जलवाहिनी टाकण्याची रखडलेली कामे, डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धोक्यात आलेले नागरिकांचे आरोग्य या प्रश्नावर मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली.

जिल्हा प्रमुख पवार व हर्षल सुर्वे यांनी शहरातील खराब रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत तसेच त्यांच्या दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता असताना त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे सांगून पवार यांनी मध्यवस्तीतील सर्वच रस्ते पूर्णत: उखडले आहेत. खराब रस्ते नव्यानेच करावेत. जे रस्ते दोष दायित्व कालावधीत खराब झाले, ते संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावेत, ज्या ठिकाणी पॅचवर्क होणार आहे, ती कामे तातडीने सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.अमृत योजनेतील काम घेतलेला ठेकेदार नगरसेवकांना दाद लागू देत नाही. नगरसेवकांचे ऐकत नाही. जर ठेकेदार उर्मट वागत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही सरळ करतो, असे पवार यांनी सांगितले. सर्वच ठेकेदारांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. कचºयाला आग लागल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्याची गांभीर्याने दखल घ्या, असे पवार म्हणाले.

प्रभारी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामाचे कसे नियोजन केले याची माहिती दिली. ठेकेदारासह खात्यांतर्गत रस्त्यांची कामेही आज, बुधवारपासून सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले, तर आयुक्त कलशेट्टी यांनी साप्ताहिक बैठकीत रस्त्यांच्या कामाचा दर्जा तसेच झालेल्या कामांचा आढावा घेतला जाईल, असे सांगितले. शिष्टमंडळात नगरसेवक राहुल चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, शिवाजीराव जाधव, प्रवीण पालव, शशिकांत बिडकर यांचा समावेश होता. यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

  • ताराराणी यांचे चित्र कचरा गाडीवर?

महापालिकेने नवीन घेतलेल्या कचºयाच्या वाहनांवर करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचा फोटो असल्याची बाब संजय पवार यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. हा करवीरकरांचा अपमान आहे. कचºयाच्या वाहनांवर कशाला पाहिजे असा फोटो, अशी विचारणा करत आजच्या आज हे फोटो काढायला सांगा, अशी मागणी पवार यांनी केली.कोल्हापुरातील खराब रस्त्यांसह इतर प्रश्नांवर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी चर्चा केली. यावेळी दत्ताजी टिपुगडे, राहुल चव्हाण, शिवाजीराव जाधव, हर्षल सुर्वे, शशिकांत बिडकर उपस्थित होते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त