कोल्हापूर : आरोग्याबाबत सजग होण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी होत आहे. त्याच्या नावनोंदणीसाठी धावपटू आणि कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महामॅरेथॉनकरिता नावनोंदणी करण्यासाठी आता अवघ्या दोन दिवसांची मुदत उरली आहे.या महामॅरेथॉनमध्ये वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना सहभागी होता येणार आहे. विविध पाच गटांमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यावर्षी होणाऱ्या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य असून, त्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला आकर्षक आणि रंगीत मेडल मिळणार आहे.
कोल्हापूरची नवी ओळख असणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन,’ १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल.
सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधाया महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा.
प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य
- ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
पैशापेक्षा आरोग्य महत्त्वाचेप्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्यासाठी धावणे आवश्यक आहे. माणसांची रोजच्या जगण्यासाठी दैनंदिन धावाधाव सुरूच असते. जीवनमान गतिमान झाल्याचा हा परिणाम आहे; त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी धावणे माणसं विसलेली आहेत. ज्या माणसाचे आरोग्य चांगले, तोच खरा श्रीमंत असतो. पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा चांगले आरोग्य असणे हे अत्यंतिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच माणसांनी रोज धावण्याचा सराव केला पाहिजे. ‘लोकमत’ची मॅरेथॉन त्यादृष्टीने प्रेरणा देणारी आहे.अॅड. सूरमंजिरी लाटकरमहापौर, कोल्हापूर.
नियमित व्यायाम महत्त्वाचामाणसाच्या जीवनात चांगले आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. आपली तब्बेत चांगली आहे, कशाला पाहिजे व्यायाम असे म्हणून आळस करणे योग्य नाही. प्रत्येक नागरिकाने व्यायामाच्या सवयी लावून घेतल्याच पाहिजेत. सगळ्यांनाच काही धावणे शक्य नाही; परंतु नियमित चालण्याचा सराव करणे फायदेशीर आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज काही मिनिटे धावण्याचा सराव केला पाहिजे. तंदुरुस्तीचा संदेश देण्याकरिता ‘लोकमत’ आयोजित करत असलेली मॅरेथॉन स्पर्धा सामाजिक तसेच शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हिताची आहे.डॉ. मल्लिनाथ कलशेट्टीआयुक्त कोल्हापूर महानगरपालिका.
व्यायाम हा आॅक्सिजननियमित व्यायामामुळे आपल्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढते, रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते; त्यामुळे रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता अधिक गतिमान होते. आरोग्य ठणठणीत राहते. हल्ली गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने व्यायाम कमी झाला आहे; त्यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. म्हणूनच रोज नियमितपणे वयोमानाप्रमाणे चालणे, धावणे यांसारखे व्यायाम केले पाहिजेत. ही सवय लावून घेतली तर तुम्ही कधी आजारी पडणार नाही. माणसाच्या आयुष्यात आरोग्याला फार महत्त्व आहे.- चंद्रकांत जाधव,आमदार, कोल्हापूर उत्तर
पैसे देऊनही स्वास्थ्य लाभत नाहीमाणसाला त्याच्या जीवनात पैशातून सर्व सुविधा मिळत असतात. पैसे देऊन वैद्यकीय सुविधाही मिळतात; परंतु उत्तम आरोग्य पैसे देऊनही मिळत नाही; त्यासाठी स्वत:लाच प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच नियमित व्यायाम करावा लागतो. चालणे, धावणे, योगासने यासाठी पैसे लागत नाहीत. फक्त आपणाला वेळ काढावा लागतो. किमान एक तास हा नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतला, तर चांगले आरोग्य तर मिळतेच; शिवाय आयुष्यही मिळते. म्हणूनच जीवनात नियमित व्यायाम, आरोग्य याला महत्त्व आहे.राजाराम गायकवाड
‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये वारणा सहकारी दूध उत्पादक संघ तिसऱ्यांदा सहभागी होत आहे. कोल्हापूरवासीयांसाठी हा एक चांगला उपक्रम आहे. या महामॅरेथॉनमधून खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याबरोबर आरोग्यविषयक जनजागृती होण्यास मदत होत आहे. त्यातून ‘व्यायामाची सवय आणि त्याचे महत्त्व’ हा अनमोल संदेश देण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. वारणा विविध उद्योग समूह, वारणा दूध संघदेखील संघाच्या कर्मचारी, शालेय विद्यार्थी-युवा वर्गासाठी सुरुवातीपासून असे वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे. आजच्या धावत्या युगामध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. आजच्या युवा धावपटू, खेळाडू, नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या चांगल्या आरोग्यासाठी ‘लोकमत मॅरेथॉन’मध्ये सहभागी व्हावे.-के. एम. वाले, सचिव, वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ.
सध्या लोकांचा व्यायामाकडील कल कमी झाला आहे. अशा स्थितीत त्यांना आरोग्याबाबत सजग करण्याचा ‘लोकमत’ने ‘महामॅरेथॉन’ हा उल्लेखनीय उपक्रम सुरू केला आहे. धावणे हा सर्वांत मुख्य व्यायामप्रकार आहे; ज्यामुळे आरोग्य बळकट राहते. आमच्या ‘एस. एस.’ परिवारातील सर्व कर्मचारी, सदस्यांना व्यायामाची सवय लागावी, ते सुदृढ आरोग्याबाबत सजग राहावेत, या दृष्टिकोनातून ‘एस. एस. कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स’ सहभागी झाले आहे. ‘लोकमत’ नेहमी विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना प्रोत्साहन देत असते. त्याअंतर्गत घेण्यात आलेला ‘गो ग्रीन सायकल रॅली’ हादेखील चांगला उपक्रम आहे. अशा स्पर्धा आणि उपक्रमांतून कोल्हापूरकरांच्या एकतेची ताकद दिसून येते. या उपक्रमांना ‘एस. एस.’चे नेहमीच पाठबळ असते. हा ‘लोकमत महामॅरेथॉन’हा स्तुत्य उपक्रम असून त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.- सिद्धार्थ शहा,सीएमडी, एस. एस. कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स.