यापूर्वी दि. २७ एप्रिलला सुपरमून पाहायला मिळाला होता. आता बुधवारी तो पुन्हा दिसणार आहे. त्यानंतर सुपरमून पाहण्यासाठी पुढील वर्षीच्या दि. १४ जूनची प्रतीक्षा लागणार आहे. या सुपरमूनबरोबरच बुधवारी खग्रास चंद्रग्रहण आहे. मात्र, भारतमधून हे ग्रहण दिसणार नसल्याची माहिती अवकाश अभ्यासक डॉ. अविराज जत्राटकर यांनी दिली. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण, दुसरा सुपरमून आणि सुपर ब्लड मून एकाच वेळेस होण्याचा योग बुधवारी आला आहे. भारतात चंद्रग्रहण हे दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल. सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे आपल्या भागातून चंद्रग्रहण पाहावयास मिळणार नसल्याची माहिती विवेकानंद महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभागप्रमुख प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली.
चौकट
मोठा, तेजस्वी चंद्र
दुसऱ्या सुपरमूनला फुल्ल फ्लॉवर मून, कॉर्न प्लँटिग मून किंवा मिल्क मून असेही म्हटले जाते. हा सुपरमून एप्रिलमध्ये दिसलेल्या चंद्राच्या अंतरापेक्षा १५७ किलोमीटरजवळ अंतरावर दिसणार आहे. तो नेहमीच्या चंद्रपेक्षा मोठा आणि तेजस्वी दिसणार असल्याची माहिती प्रा. कारंजकर यांनी दिली.