शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पीरवाडीत जुगार अड्ड्यावर छापा; १९ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:58 AM

कोल्हापूर : पीरवाडी (ता. करवीर) येथील माळरानावरील साई कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बंद खोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री करवीर पोलिसांनी छापा टाकून, खासगी सावकार सूरज साखरेसह १९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, ११ दुचाकी, १ कार, २२ मोबाईल, गॅस सिलिंडर असा सुमारे १२ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त ...

कोल्हापूर : पीरवाडी (ता. करवीर) येथील माळरानावरील साई कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बंद खोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री करवीर पोलिसांनी छापा टाकून, खासगी सावकार सूरज साखरेसह १९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, ११ दुचाकी, १ कार, २२ मोबाईल, गॅस सिलिंडर असा सुमारे १२ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या संशयितांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका झाली.अधिक माहिती अशी, पीरवाडीच्या माळावर साई कला- क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बंद खोलीमध्ये पत्त्यांचा जुगार सुरू आहे, अशी माहिती खबऱ्याकडून करवीर विभागीय पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व पथकाला घेऊन शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास छापा टाकला. अचानक पडलेल्या छाप्याने जुगार खेळणारे भांबावून गेले. पोलिसांनी चारीही बाजूंनी खोलीला वेढा घातला होता. तरीही त्यातून काहीजणांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.यावेळी पोलिसांच्या हाती १९ जण लागले. पोलिसांनी जाग्यावर पंचनामा करून ८७ हजार रोख,१ लाख २१ हजार रुपये किमतीचे २२ मोबाईल, ११ दुचाकी व १ कार, असा १२ लाख ५९ हजारांचा मुद्देमालजप्त केला. ताब्यात घेतलेल्यांना खोलीतच जमिनीवर बसवून त्यांचे नाव, पत्ता विचारून घेतले. माळरानावर वाहनांची गर्दी, जत्रा फुलल्यासारखी असायची.अटक केलेल्यांची नावे अशी :संशयित क्लब मालक सूरज हणमंत साखरे (वय ३०, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), इस्माईल शौकत बागवान (वय ३५, रा. सुभाषनगर, कोल्हापूर), दादासो महिपती आळवेकर (२२, रा. कसबा बावडा, चौगले गल्ली), रोहित शंकर जगमळाणी (३०, रा. सर्किट हाऊससमोर, सरलष्कर भवन), सचिन चंद्रकांत सावंत (२६, रा. जलदर्शन कॉलनी, देवकर पाणंद) शेखर दिलीप गाडेकर (२८, रा. जयसिंगपूर), विनायक रामभाऊ केळकर (३३, रा. संभाजीनगर स्टॅन्ड), उमेश दिनकर उलपे (२२, रा. उलपे मळा, कसबा बावडा) जयदीप राजाराम अतिग्रे (२८, रा. पडवळवाडी, ता. करवीर), संभाजी हणमंत जाधव (४०, रा. साळोखे नगर), स्वप्निल तुकाराम पोवार (२२, रा. कळे, ता. पन्हाळा), सागर सुभाष पाटील (३२), अभिजित सुभाष पाटील (३०, दोघेही रा. मंगळवार पेठ), सरदार आनंदा पाटील (२८, रा. आर. के. नगर, कोल्हापूर, श्रीकांत शामराव पाटील (२९, रा. कुई, ता. करवीर), अमित बाळासाहेब बुकशेठ (३५, रा. रुईकर कॉलनी, महाडिक माळ), प्रकाश बाबूराव पाटील (४०, रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर), वसीम मेहमुद कुमंदन (२९, रा. न्यू शाहूपुरी), श्रीधर दत्तात्रय डावरे (३६, रा. सोनगे, ता. कागल).आठवड्याला जत्रा फुलतेसंशयित सूरज साखरे याने सांस्कृतिक क्लबच्या नावाने परवानगी घेतली आहे. काही दिवस हा क्लब चालविला. त्यानंतर क्लब बंद करून जुगार अड्डा सुरू केला. दर शनिवार-रविवार जत्रा फुलल्यासारखी लोकांची जुगार खेळण्यासाठी गर्दी होत असते. याठिकाणी सभासद नोंदणी करून घेतली जात होती. रात्री-अपरात्री हे जुगार खेळणारे मद्यपान करून असतात. या परिसरातील रहिवाशी महिला व युवतींना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. सराईत गुन्हेगारांची या ठिकाणी नेहमी ये-जा असायची. नागरिकांच्या पाचविला हा त्रास पुजलेला असायचा. या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांतून कौतुक होत आहे.