कोल्हापूर/जोतिबा : जोतिबा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला . महाराष्ट्र सह कर्नाटक भाविकांनी तेल ' कडाकणी, ऊस अर्पण करून जोतिबांचे दर्शन घेतले.दख्खनचा राजा श्री. जोतिबा नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला जागर झाला. पाच कमळ पुष्पामध्ये बैठी सालंकृत महापूजा बांधली. जोतिबा देवासमोर प्रतिकात्मक अश्व पूजा बांधण्यात आली.
जोतिबा मंदिर गाभाऱ्यात जेरबेरा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी १० वाजता धुपारती सोहळा निघाला. फलाहाराची पाच ताटे नैवेद्य यमाई मंदिराकडे वाजत गाजत गेला. भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मंदिरा सभोवती चार पाच पदरी दर्शन रांगा लावल्या होत्या.
महाराष्ट्रसह कर्नाटक भागातून आलेल्या भाविकांची गर्दी मोठी होती. मंदिरात ऊस ' कडाकणी तेल अर्पणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. शाहवाडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी आर आर. एस .टी. महामंडळाने जादा गाडया ची सोय केली. खाजगी वहातुकही मोठया प्रमाणात होती. रात्री जोतिबा स्थानिक भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. रात्रभर मंदिर खुले राहीले.