शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जोतिबा मंदिर दर्शन मंडपाचे काम बंद : दहा टक्केही काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:31 AM

Jyotiba Temple, Mahesh Jadhav , kolhapur, Religious Places महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा मंदिराजवळील सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या दर्शन मंडपाचे काम गेल्या दीड महिन्यापासून बंद पडले आहे. आधी तांत्रिक कारणाने, नंतर लॉकडाऊन- कोरोनामुळे काम थांबले.

ठळक मुद्देजोतिबा मंदिर दर्शन मंडपाचे काम बंद : दहा टक्केही काम नाहीकामाची मुदत २० फेब्रुवारीला संपणार

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा मंदिराजवळील सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या दर्शन मंडपाचे काम गेल्या दीड महिन्यापासून बंद पडले आहे. आधी तांत्रिक कारणाने, नंतर लॉकडाऊन- कोरोनामुळे काम थांबले.

आता देवस्थान समिती, ठेकेदार, आर्किटेक्ट यांच्यातील योग्य समन्वयाच्या अभावामुळे काम बंद पडले. एकीकडे निधी नसल्याने काम थांबतात, इथे मात्र निधी असूनही काम थांबल्याचे चित्र पहायला मिळत आहे.देवाच्या द्वारी कशाचीही कमतरता राहू नये, अशी तमाम भाविकांची मानसिकता असते, परंतु याच्याबरोबर उलटा अनुभव जोतिबा मंदिर दर्शन मंडपाच्याबाबतीत येत आहे. ज्या प्रकारे अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रदीर्घ काळ लांबला त्याच वाटेवरून जोतिबा मंदिर परिसर विकासाचे काम जात असल्याची शंका येऊ लागली आहे.

जोतिबा मंदिर परिसर विकास योजनेतून प्रामुख्याने दर्शन मंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्याला निधी देखील प्राप्त झाला. २० फेब्रुवारी २०१८ रोजी शिवप्रसाद कन्स्ट्रक्शन यांना कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. काम पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षाची होती. ती दि. २० फेब्रुवारी २०२० रोजी संपणार आहे. काम मात्र जोथ्यापर्यंतच आले आहे.वर्कऑर्डर मिळाल्यानंतर ठेकेदाराने काम सुरू केले. दर्शन मंडपाच्या जागी असणाऱ्या जुन्या इमारतीचे बांधकाम पाडण्यास तब्बल सात महिने गेले. काम सुरू झाले तोवर आणखी एक अपेक्षाभंग झाला. अपेक्षित नसताना पाया खुदाई वीस फुटापर्यंत करावी लागली. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागले.

पुन्हा काम सुरू होते ना होते तोच लॉकडाऊन सुरू झाले. दरम्यानच्या काळात ठेकेदाराने जोथ्यापर्यंत काम आणून आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण केले. लॉकडाऊन उठल्यानंतर काही महिने काम सुरू राहिले, पण गेल्या दीड महिन्यापासून अचानक काम थांबले आहे.कामाची व्याप्ती अशी असेल-

  • वीस हजार चौरस फुटांचे बांधकाम होणार
  • ग्राऊंड फ्लोअर आणि त्यावर तीन मजल्यांची इमारत.
  • देवस्थान समिती, पोलीस चौकीसह टॉयलेट ब्लॉक समावेश
  • काम सुरू करण्याच्या सूचना

पंधरा दिवसांपूर्वी मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन दर्शनमंडपाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी देवस्थानचे सचिव विजय पोवार यांना ठेकेदारास मंडपकाम सुरू करण्याच्या तसेच कामाची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिलासह अन्य कोणत्याही अडचणीमुळे काम थांबलेले नाही, अशी माझी माहिती आहे.- महेश जाधव, अध्यक्ष,देवस्थान समिती

टॅग्स :Jyotiba TempleजोतिबाMahesh Jadhavमहेश जाधवkolhapurकोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळे