गेल्या काही दिवसांपसून व जिल्ह्यातदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. येत्या रविवारपासून श्री जोतिबा येथील खेट्यांना सुरुवात होते. या अंतर्गत येणाऱ्या पाच रविवारी मोठ्या संख्येने भाविक डोंगरावर येतात. मात्र, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणार नाही व कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढेल या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी देवस्थान समितीला खेट्यांचे आयोजन करू नये, असे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार कार्यवाही करत देवस्थान समितीने पाच रविवारी मंदिरच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत येणारा रविवार (दि. २८ फेब्रुवारी), त्यानंतर ७ मार्च, १४, २१ व २८ मार्च असे पाच रविवार मंदिर भाविकांसाठी बंद राहील. अन्य दिवशी मंदिर दर्शनासाठी खुले राहील, मात्र, भाविकांनी दर्शनासाठी येताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून, सॅनिटायझरचा वापर करावा व तापमान तपासणी करून घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच भाविकांना मंदिरात सोडले जाईल तरी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
---
सुचना : जोतिबा देवाचा फोटो वापरावा
-