कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथील जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज, सोमवारी होणार आहे. ही यात्रा केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे जोतिबा डोंगराकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आहेत. याशिवाय एक पोलीस अधीक्षक, चार पोलीस निरीक्षकांसह ३०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांसह देवस्थानच्या कर्मचारी मानकऱ्यांचीही कोरोना चाचणी होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा जोतिबाच्या यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने केवळ २१ मानकऱ्यांनाच परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीपासूनच वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगरावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वत: पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आर.आर. पाटील यांनी रविवारी जोतिबा डोंगरावरील बंदोबस्ताची पाहणी केली. डोंगराकडे येणारे तिन्ही रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. हा बंदोबस्त उद्या, मंगळवारी रात्रीपर्यंत असणार आहे. बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची व मानकऱ्यांची अँटिजेनसह आरटीपीसीआर चाचणी केली.
जात आहे. त्यानंतरच त्यांची रवानगी डोंगराव केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे ग्रामस्थानी डोंगराकडे येऊ नये. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
बंदोबस्त असा
पोलीस अधीक्षक (१), पोलीस उपअधीक्षक (१), पोलीस निरीक्षक (४), पोलीस कर्मचारी (८०), स्ट्रायकिंग फोर्स (१०), गृहरक्षक दलाचे जवान (१२०) यांचा समावेश आहे.