डोंगरावर येऊ नये, असे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते.
माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमा दरम्यान येणारे रविवार म्हणजे जोतिबा देवाचे खेटे रविवारी असतात. कोल्हापूर ते जोतिबा पायी चालत जाऊन रविवार खेटे करण्याची धार्मिक परंपरा आहे. २८ फेब्रुवारीपासून खेटे रविवारी यात्रेस प्रारंभ झाला. पहिल्या खेटेला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे पहाटेपासूनच डोंगराच्या पायथ्याला कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुशिरे, गिरोली, दाणेवाडी, ,पोहाळे या गावातून जोतिबा डोंगरावर जाणाऱ्या मार्गावर कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. जोतिबा डोंगरच्या निम्या वाटेवरून अनेक भाविकांना जोतिबा दर्शनाविना माघारी परतावे लागले.
दरम्यान, मंदिरातील धार्मिक विधी मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. सकाळी नऊ वाजता अभिषेक विधी झाला. सकाळी ११ वाजता उंट घोडे ‘वाजंत्री, देवसेवक, पुजारी मानकरी यांच्या लवाजम्यासह मोजक्या पुजारी मानकरींच्या उपस्थितीत धुपारती सोहळा झाला. रात्री आठ वाजता पालखी सोहळा झाला. भाविकांविना मंदिर परिसर सुनासुना दिसत होता. गेल्या वर्षी चौथ्या खेटेला लॉकडाऊनमुळे मंदिर बंद झाले होते. यावर्षी पहिल्या खेटेलाच मंदिर बंद ठेवण्यात आले. मंदिर मार्गावरील बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असल्याने शुकशुकाट दिसत होता. व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वाहन पार्किंग, माणसी कर उत्पन्नाला मोठा आर्थिक फटका बसला. खासगी वाहतूकबरोबर एस.टी. महामंडळाची वाहतूकही ठप्प होती. जोतिबा डोंगरच्या पायथ्याला असणाऱ्या प्रत्येक नाक्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात होता. स्थानिक नागरिकांनाही आधार कार्ड पुराव्याशिवाय जोतिबा डोंगरावर प्रवेश दिला जात नव्हता.
फोटो आहेत : दीपक जाधव यांनी सिटी ऑफिसमधून पाठविले आहेत.