कोपार्डे : कुडित्रे गावच्या निवडणुकीकडे करवीर तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. येथे काँग्रेस व शिवसेनेत उभी फूट पडून स्थानिक आघाडी निर्माण झाली होती. यात दोन्ही बाजूला मातब्बर गटनेत्यांचे कुडित्रेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले होते. यात ‘कुंभी’चे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, माजी संचालक मदन पाटील व रघुनाथ शेलार गटाने एकतर्फी १० विरुद्ध १ अशी आघाडी घेत ग्रामपंचायत ताब्यात घेतली.
गुरुवारी झालेल्या सरपंचपदी स्थानिक आघाडीच्या जोत्स्ना युवराज पाटील यांची, तर उपसरपंचपदी राजाराम बाजीराव कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी अजित कांबळे होते.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुंभी-कासारीचे माजी चेअरमन संभाजी ज्ञानू पाटील, भिकाजीराव गायकवाड, मदन पाटील, आनंदराव पाटील, रघुनाथ शेलार, विलास पाटील, गणपती पाटील, संजय पाटील, बदाम शेलार यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीचे पॅनेल होते, तर विरुद्ध यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील व कुंभी-कासारीचे संचालक ॲड बाजीराव शेलार, बाजार समितीचे माजी सभापती पै. संभाजी पाटील, माजी सरपंच सरदार पाटील यांनी आपले पॅनल उभा केले होते. गेली दहा वर्षे एकनाथ पाटील यांची येथे सत्ता होती. मागील पाच वर्षांत शिवसेनेची सत्ता होती. मात्र, यावेळी संभाजी पाटील गटाने १० विरुद्ध १ असे सतांतर घडवून आणले. सरपंच पदासाठी जोत्स्ना पाटील यांचे नाव अजित पाटील यांनी, तर उपसरपंच पदासाठी राजाराम कदम यांचे नाव संभाजी भास्कर यांनी सुचविले. आभार ग्रामविस्तार अधिकारी विलास राबाडे यांनी मानले. यावेळी तलाठी राजाराम चौगले व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
फोटो
सरपंच ज्योत्स्ना पाटील
उपसरपंच राजाराम कदम