कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आरोपांमुळे प्रसिद्धीस आलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे कार्यालयातील आपली बैठक व्यवस्थाच बदलली आहे. भ्रष्टाचार प्रकरण सुरू असलेली चौकशी व रोज नव्याने होत असलेल्या चौकशा थांबाव्यात यासाठी खुर्चीची दिशा बदलण्याचा सल्ला एका ज्योतिषाने दिल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर जिल्हा परिषदेत सुरू होती. शिंदे यांच्या विरोधात वैयक्तिक मान्यतेबाबत वाईट अनुभव येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या विभागातील काही कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप करत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या होती. त्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शिंदे यांच्या कारभाराची चौकशी करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश चौकशी समितीला दिले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली असून, ते चौकशी करत आहेत.शिंदे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. या चौकशीतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी व नवीन तक्रारी येऊ नयेत, यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. एका ज्योतिषाने शिंदे यांना कार्यालयातील बैठक व्यवस्था बदलण्याचा सल्ला दिल्याची चर्चाही आता जोर धरू लागली आहे. चौथ्या मजल्यावरील कार्यालयात शिंदे यांची बैठक व्यवस्था पूर्वेकडे दिशा करून होती. त्यात बदल करून आता ही दिशा उत्तरेकडे केली. चौकशी अहवाल आजअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी पूर्ण केली असून त्याचा अहवाल आज, शनिवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
ज्योत्स्ना शिंदेंनी बदलली कार्यालयातील बैठक व्यवस्था
By admin | Published: February 18, 2017 12:55 AM