शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : गेली दहा वर्षे बिद्री कारखान्यात केलेला मनमानी कारभार, कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, जिल्ह्यातील अनेक नेत्यांची केलेली फसवणूक यातून बिद्रीच्या सत्तेचा राज्यमार्ग काढण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांना चंद्रकांतदादांच्या (भाजपच्या) ताकदीची आवश्यकता का हवीशी वाटली आहे? कारखाना प्रचंड नफ्यात आणला असा दावा करणाºया या जोडीला आता भाजपच्या सोबतीची निकड का? घराणेशाही, तोडणी कार्यक्रमाचा वचपा मतदार काढतील अशी भीती? अपात्र सभासदांचा मुद्दा ‘किमयागार’ होण्यात कमी पडत आहे का?माजी आमदार के. पी. पाटील यांनी भाजपशी युती केल्यानंतर सर्वसामान्य मतदारांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले आहे. हजारो सभासद अपात्र केल्याची टीका आमदार आबिटकर गटावर करीत गावागावांत संपर्क सभांचा सपाटा लावला असताना भाजप आणि के. पी. यांची युती म्हणजे के. पी. पाटील गटाने आत्मविश्वास गमावल्याचे द्योतक आहे का? म्हणूनच आघाडी केल्याची जोरदारपणे चर्चा सुरू झाली आहे.भाजप पर्यायाने चंद्रकांतदादा यांच्या कारभाराची खिल्ली उडवणारी आणि त्यांच्यावर प्रचंड टीका करणारी त्याचबरोबर चंद्रकांतदादांच्या घरावर मोर्चा काढणारी हसन-किसनची जोडी आज मात्र बिद्रीच्या राजकारणात सत्तेच्या मोहासाठी भाजप- राष्ट्रवादीच्या युतीबद्दल ढोल-ताशा बडवताना दिसत आहे. आजपर्यंत एकाही भाजपच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने या युतीला दुजोरा दिलेला नाही. सध्यातरी केवळ के. पी. पाटील यांना या युतीचे प्रचंड डोहाळे लागले आहेत असंच दिसतंय.विरोधकांनी अभ्यासपूर्ण कागदोपत्री पुराव्यांसह शोधलेले प्रचंड भ्रष्टाचाराचे मुद्दे, त्या मुद्द्यांवर आक्रमक असलेले विरोधक, त्यातून के.पीं.च्या भ्रष्टाचाराची होणारी पोलखोल यामुळे माजी आमदार के. पी. पाटील भलतेच भयभीत झाले आहेत. येणाºया काळात शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठीच निष्कलंक, राज्य शासनात प्रचंड प्रभाव असणाºया मंत्री चंद्रकांतदादांना या पापाचा वाटेकरी करण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिद्रीच्या गत निवडणुकीतील के. पी. पाटील यांच्या आघाडीची रचना पाहता आणि सध्याच्या भाजपशी संधान बांधून के. पीं.नी काय वाढीव साध्य केले? असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या भाजपवासी असणारे कागलचे समरजितसिंह घाटगे, राधानगरीतील पनोरीचे भगवान पातले, फराळेचे बळवंत पाटील, भदरगडमधील युवा नेते देवराज बारदेसकर, कोनवडेचे ए. व्ही. पाटील, गंगापूर येथील अमर पाटील, वेंगरुळचे एन. के. देसाई, देवर्डेचे बाजीराव कोटकर, कडगावचे दिगंबर देसाई, पुष्पनगरचे जयवंत चोरगे, शिंदे सालपेवाडी हे जिल्हा परिषद, पं. स. निवडणूक लढवणारे सर्व कार्यकर्ते मागच्या निवडणुकीत ताकदीने के.पीं.च्या आघाडीबरोबर कार्यरत होते. केवळ माजी आमदार बजरंग अण्णांचा एक गट वगळता सर्व के. पीं.च्या बरोबर कार्यरत होते.याउलट के. पीं.च्या आघाडीमधून सरवडेचे माजी संचालक विजयसिंह मोरे, कडगाव तिरवडे येथील कोकण केसरी के. जी. नांदेकर हे बाहेर पडले आहेत. त्यांच्याबरोबर जाधव गुरुजी तळाशी, प्रकाश आबिटकरांच्या आमदारकीच्या काळात छोटेमोठे बाहेर पडलेले कार्यकर्ते, कागलमधून राजेखान जमादार बाहेर पडले आहेत.आबिटकर गट सक्रियके. जी. नांदेकर आणि विजयसिंह मोरे यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. केवळ आमदार आबिटकर गटाचे प्रमुख नेते म्हणून गटासाठी घेतलेल्या या भेटीने भाजप नेते वेगळ्याच भूमिकेत पोहोचले आहेत. यापुढे भाजप आणि आमदार आबिटकर गट एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास नवल वाटू नये!
के. पीं.च्या आघाडीला दादांच्या ताकदीचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:12 AM