या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आर. डी. पाटील (वडगावकर) यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त होते. संस्थेच्यावतीने सोमवारी शोकसभा घेऊन आर. डी. पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यकारी मंडळाची सभा झाली. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष ए. बी. पाटील होते. नूतन अध्यक्ष के. जी. पाटील हे मूळचे गुडाळ (ता. राधानगरी) येथील आहेत. त्यांचा फॅब्रिकेशनचा कारखाना आहे. उद्योजक असणारे पाटील हे सन १९८४-८५ पासून श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या कार्यकारी मंडळावर कार्यरत आहेत. त्यांनी सन १९९१-९२ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. राजोपाध्येनगर येथील संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी, तर कोल्हापूर जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ते कार्यरत आहेत.
प्रतिक्रिया
महाराष्ट्र हायस्कूलच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. मला घडविण्यात या संस्थेचे मोठे योगदान आहे. यापूर्वी मी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ही संस्था मला वडिलांसारखी आहे. तिचा लौकिक वाढविण्यासह अधिक ऊर्जा देण्याच्यादृष्टीने मी कार्यरत राहणार आहे.
-के. जी. पाटील, नूतन अध्यक्ष
फोटो (२३०२२०२१-कोल- के जी पाटील (प्रिन्स शिवाजी बोर्डिंग)