कणेरी : कणेरी (ता. करवीर) येथील श्री काडसिद्धेश्वर सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अंकुश पाटील, बाळासाहेब चव्हाण, विश्वास शिंदे, अॅड. एम. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री काडसिद्धेश्वर सेवा पॅनेलने विजय मिळविला.निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. जी. शिंदी यांनी काम पाहिले.श्री काडसिद्धेश्वर विकास संस्थेच्या तेरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली. यामध्ये श्री काडसिद्धेश्वर सेवा पॅनेलचे भटक्या विमुक्त जातीचे अशोक हरी लोहार यांची बिनविरोध निवड झाली. या पॅनेलच्या तेरा उमेदवारांपैकी एक उमेदवार बिनविरोध, तर बाकी आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.माजी सरपंच जयसिंग पाटील व राजेंद्र खेराडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री काडसिद्धेश्वर लोकसेवा विकास आघाडी पॅनेलचे चार उमेदवार निवडून आले.श्री काडसिद्धेश्वर सेवा पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते कंसात : आप्पासाहेब यशवंत चव्हाण (५७४), शिवाजी महादेव चोरडे (५६३), विठ्ठल ज्ञानू कदम (५१९), नामदेव विष्णू पाटील (४७०), विठ्ठल यशवंत पाटील-तांबडे (४७०), संगीता तानाजी पाटील (४९४), कृष्णात शंकर माळी (५२५), राजाराम बाबूराव शिंदे (५५०), अशोक हरी लोहार (बिनविरोध).विरोधी पॅनेल : श्री काडसिद्धेश्वर लोकसेवा विकास आघाडीचे विजयी उमेदवार : चंद्रकांत रामचंद्र पाटील (५०५), दगडू रामचंद्र पाटील (५२६), बाबासो आत्माराम शिंदे (५१३), सुजाता अमर इंगळे (४६८).श्री काडसिद्धेश्वर सेवा पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव पाटील, अर्जुन इंगळे, वाय. एस. पाटील, सुरेश पाटील, श्रीधर पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
कणेरी सोसायटीत काडसिद्धेश्वर सेवा पॅनेल विजयी
By admin | Published: March 03, 2015 8:05 PM