शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कागल भूमिअभिलेख कार्यालयास टाळे

By admin | Published: July 15, 2016 9:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी

कागल : कागल येथील भूमिअभिलेख कार्यालयात रिक्त पदे असल्याने, तसेच जे क र्मचारी आहेत ते वेळेत कामकाज करीत नसल्याने तालुक्यातील जनतेची अनेक कामे प्रलंबित आहेत. गावोगावी तंटे, वाद चिघळत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथे आंदोलन करीत कार्यालयास टाळे ठोकले.तलाठी, सर्कल यांच्या बैठकीसाठी आलेल्या प्रांताधिकारी मोनिका सिंग यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन घातलेले कुलूप काढून घ्या, असे सांगितल्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत अचानक घडलेल्या या प्रकाराने वातावरण तणावपुर्ण झाले. विविध अडचणी, समस्या मांडण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, महिला आघाडीच्या आशाकाकी जगदाळे, नवल बोते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आले होते. अचानक कार्यकर्ते घोषणा देत आल्याने कर्मचारी वर्ग घाबरतच बाहेर पडला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ताळे ठोकले. हा प्रकार समजताच कागल पोलिसही हजर झाले.भैया माने म्हणाले, येथे कायमस्वरूपी भूमी अभिलेखक निरीक्षक हे पद हवे. आता जे निरीक्षक आहेत, त्यांच्याकडे चार-पाच ठिकाणचा पदभार असल्याने सर्व कामे प्रलंबित आहेत. इतर कर्मचारी, अधिकारी पदे रिक्त आहेत. आमदार मुश्रीफांनी आपल्या सत्ताकाळात येथे कायमस्वरूपी हे पद ठेवून कामकाज सुरळीत ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनाही ही परिस्थिती सांगितली होती. कागल तालुक्यात जनतेची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. कागल शहराचा सिटी सर्व्हे प्रलंबित आहे, म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तत्काळ येथे पदे द्यावीत; अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करू. यावेळी शिवानंद माळी, प्रकाश गाडेकर यांची भाषणे झाली. आभार नगराध्यक्षा संगीता गाडेकर यांनी मानले. आंदोलनात आशाकाकी माने, रंजना सणगर, संजय चितारी, प्रवीण गुरव यांच्यासह संभाजी कोराणे, इरफान मुजावर, संजय ठाणेकर, सुधाकर सोनुर्ले, गणेश सोनुर्ले, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.