शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
2
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
3
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
4
"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"
5
Dolly Chaiwala : 'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
7
कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात
8
आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."
9
परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
10
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
11
निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी
12
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
13
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
14
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
15
८५ जागा खात्रीच्या, भाजपने केली कॅटेगरी; विधानसभेसाठी पक्षाची रणनीती
16
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत
17
‘महा-हब’चे घोंगडे भिजत पडले ; नव उद्योजकांसाठीच्या प्रकल्पाला फक्त मान्यताच, अद्याप कार्यवाही नाही
18
सी-लिंकवर महागड्या कारची लागली रेस; वाहतूक एक तास खोळंबली
19
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
20
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका

कागलमधून तुतारी हाती घेत हसन मुश्रीफांना आव्हान देणार?; समरजीतसिंह घाटगेंचं मोजक्या शब्दांत थेट उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 9:40 PM

आगामी काळात कागलच्या राजकारणात नक्की काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Kagal Asselmbly ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच सर्व राजकीय पक्षांकडून मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षफुटीनंतर साथ सोडलेल्या आमदारांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवारांकडून भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत आता घाटगे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"माझ्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच चर्चा सुरू आहे. परंतु याबाबतच्या ऑफरला मी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. माझ्या उमेदवारीच्या सर्व चर्चाही मी माध्यमांवरच बघत आहे," असा खुलासा समरजीतसिंह घाटगे यांनी केला आहे.

दरम्यान, सध्या समरजीतसिंह घाटगे यांनी आपले पत्ते ओपन करण्यास नकार दिला असला तरी आगामी काळात कागलच्या राजकारणात नक्की काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हसन मुश्रीफांनी काय म्हटलं आहे? समरजीतसिंह घाटगे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या विरोधात कोण उमेदवार असेल याची मी चिंता करत नाही. मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हावर माझा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मी आमदार होणार मंत्रिमंडळातही सहभागी होणार," असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Samarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस