शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

कागल तालुका : उसाच्या वजनात हेक्टरी सरासरी १० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:14 AM

कागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक

ठळक मुद्देकारखान्याचा ९० दिवसांचा हंगाम सुरळीत; मार्चअखेरपर्यंत हंगाम चालणार

जहाँगीर शेख ।कागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक करीत असल्या तरी हंगामात नैसर्गिकरीत्या उसाचे टनेज वाढल्याने आणि त्याची सरासरी हेक्टरी १० टक्के इतकी असल्याने कारखान्यांना उसाची पुरेशी उपलब्धता होत आहे. उलट तोडणी-वाहतूक यंत्रणा अपुरी पडण्याचे प्रकार घडत आहे.

तालुक्यात दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, हमीदवाडा आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना हे साखर कारखाने आहेत, तर पंचगंगा इचलकरंजी, जवाहर-हुपरी, राजाराम-कोल्हापूर, व्यंकटेश्वरा-बेडकीहाळ, हालसिद्धनाथ-निपाणी, गुरुदत्त-टाकळी असे साखर कारखानेही तालुक्यात उसाची तोडणी करीत आहेत. एकीकडे उसाचे क्षेत्र फारसे वाढलेले नाही; मात्र उसाच्या टनेजमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही टनेज वाढ सरासरी हेक्टरी दहा ते बारा टन आहे. यामुळे कारखान्यांनाही उसाचा पुरवठा वाढला आहे. साधारणत: मार्चअखेर हंगाम चालण्याची शक्यता आहे.

आपला ऊस लवकर तुटावा म्हणून शेतकरी वर्ग ऊसतोडणी मजुरांना, त्यांच्या टोळ्यांना चुचकारत आहेत. तालुक्यातील साखर कारखान्यांनी ९० दिवसांचा यशस्वी हंगाम पूर्ण केला आहे. या हंगामात साधारणत: पाच महिने साखर कारखाने चालतील. यापैकी संताजी घोरपडे साखर कारखाना सर्वांत आधी चालू झाला आहे. सर्वच साखर कारखान्यांना हा हंगाम सुरळीत आणि चांगला जात आहे.सहकारी साखर कारखान्यांचे गाळप६ फेब्रुवारीअखेर तालुक्यातील साखर कारखान्यांनी आपला ९० दिवसांचा गळीत हंगाम पूर्ण केला आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू साखर कारखान्याने पाच लाख ४४ हजार ३३० मे. टन उसाचे गाळप करीत १२.०५ टक्के साखर उतारा घेत ६ लाख ४० हजार ५५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे. बिद्री साखर कारखान्याने चार लाख ५० हजार ४२२ मे. टन उसाचे गाळप करीत १२.७० टक्के उताºयाने ५ लाख ६९ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे, तर हमीदवाडा-मंडलिक कारखान्याने ३ लाख ६१ हजार ५१० मे. टन उसाचे गाळप करीत सरासरी १२.३१ टक्के उताºयाने ४ लाख ४२ हजार १५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे.

तालुक्यातील दोन लाख मे. टन ऊस वाढला४कागल तालुक्यातील साधारणत: १८ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. सप्टेंबर आणि आॅक्टोबर २०१७ मध्ये पडलेल्या पावसाने आणि पूरक हवामानामुळे ऊस पिकाला मोठा लाभ होऊन उत्पादन वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गतवेळीपेक्षा हेक्टरी सरासरी १० ते १२ टन उसाचे जादा उत्पादन निघत आहे. सरासरी दोन लाख मे. टन ऊस वाढल्यासारखा हा प्रकार आहे. हा टनेजवाढीचा प्रकार लक्षात घेऊन साखर कारखानेही फेब्रुवारी २०१८ मध्ये ज्या कारखान्यांचे गाळप बंद होतात त्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.