कोल्हापूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे ‘कागल’ मतदारसंघातून पोस्टल मतामध्ये पिछाडीवर राहिले, त्यानंतरच्या फेरीत कमी मताधिक्य राहिल्याने त्यांच्या समर्थकांची चांगलीच घालमेल सुरु होती, पण बाराव्या फेरी अखेर त्यांनी ४७८८ चे मताधिक्य घेऊन विजयाकडे आगेकुच केली आहे. येथे शेवटपर्यंत श्वास रोखायला लावणारी लढत आहे.‘कागल’ मतदारसंघात कागल, गडहिंग्लज शहर, कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ तर आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारांचा समावेश आहे. येथे सुरुवातीपासूनच काटा लढत पहावयास मिळाली. त्यामुळे येथे पहिल्या फेरीपासून मताधिक्याचा लंबक इकडून तिकडे फेरीत होता. पहिल्या सहा फेरीत हसन मुश्रीफ हे पिछाटीवर होते. मात्र, नवव्या फेरीपासून मताधिक्य कमी करुन त्यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. बाराव्या फेरीअखेर त्यांनी ४७८८ चे मताधिक्य घेत विजयाकडे आगेकूच राखली आहे.
Maharashtra Assembly Election Results
मंत्री हसन मुश्रीफ यांनी हजारो कोटींची विकास कामे गेल्या पाच वर्षात केली आहेत. त्याच बळावर ते ‘कागल’च्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी हातात ‘तुतारी’ घेऊन आव्हान उभे केले होते. येथे विकासावर आरोप-प्रत्यारोप झालेच त्याचबरोबर व्यक्तीगत टोकदार आरोप झाल्याने ही निवडणूक रंगतदार बनली होती.