शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
6
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
7
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
8
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
9
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
10
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
12
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
13
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
14
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
15
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
16
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
17
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
18
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
19
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
20
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

कागलच्या भुमिपुत्राची गरूड भरारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:26 AM

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी ...

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी चौक ते मंत्रालय असे म्हणावे लागेल. राजकीय पंडितांनीही आवक् व्हावे, असा हा प्रवास आहे. तसे तर आम्ही मुश्रीफांचे राजकीय सहकारी आणि विरोधकही होतो. विक्रमसिंह घाटगेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. नंतर मुश्रीफ साहेब मंडलिक गटात गेले. ते आमचे राजकीय विरोधक बनले; पण या विरोधात त्यांचे दोन गुण मला आवडले. एक तर ते एका बाजूला राजकीय अपरिहार्यता म्हणून टोकाचा विरोध करतातच; पण दुसऱ्या बाजूला विरोध विसरूनही जातात. विधायक काम आणि व्यक्तिगत आडचणीत ते कट्टर विरोधकालाही छातीशी धरतात. एकच मुद्दा घेऊन खुजे राजकारण करीत नाहीत. मनात शल्य साचून ठेवीत नाहीत. त्यांनी जिल्ह्यात आज आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. ते या दोन गुणांच्या जोरावरच, असे म्हणावे लागेल. माझ्यासारखा कार्यकर्ता गट तटाच्या राजकारणात त्यांचा विरोधक होता; पण मला मिळालेल्या सत्तेतून कागल शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण एकत्र काम करूया, यासाठी चांगल्या माणसासाठी पुढे आले पाहिजे, अशी भूमिका घेणारे हे नेतृत्व आहे. आज कागल शहर राज्यात आघाडीवर आहे. क वर्ग नगरपालिका असूनही महानगरपालिकेसारखी कामे झाली आहेत. देशात जे जे चांगले आहे ते कागलात असायला हवे, हा त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्याला समजून घेणारा, त्याच्या प्रत्येक सुख दुखात सामील होणारा, अडचणी ऐकून घेऊन जेवढे शक्य तेवढे सहकार्य, मदत प्रामाणिकपणे करणारा हा नेता राजकारणात वस्ताद असला तरी सामाजिक जाणिवा जपणारा संवेदनशील व्यक्तीही आहे. कार्यकर्त्यांच्या मागे हिमालयासारखी भक्कम ताकत उभी करण्याचे धाडस कोल्हापूर जिल्ह्यात फक्त आणि फक्त हसन मुश्रीफ करू शकतात. हे अनेक प्रसंग, घटनांमध्ये सिद्ध झाले आहे. राजकीय संघर्षात ते वज्राहून कठोर बनतात; पण जेव्हा कार्यकर्त्यांवर दुखाचे प्रसंग येतात तेव्हा ते मेणाहून मऊ बनतात. आपल्या कर्तृत्वान कार्यकर्त्यांला मानाची पदे मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे, सामान्य निवडणूकही सिरिअसपणे घेऊन कार्यकर्ता जिंकलाच पाहिजे म्हणून तन- मन- धन, साम दंड भेद अशा सर्वच अस्त्रांचा उपयोग करणारे मुश्रीफसाहेब आपण निवडलेल्या उमेदवाराचा विजय झालाच पाहिजे म्हणून प्रचाराचे रान उठवितात.

आज ते राज्याचे ग्रामविकासमंत्री आहेत. कामगारमंत्री म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त खाते आहे. अव्याहतपणे त्यांचे कार्य सुरू आहे. सदैव उपल्बध, कधीही भेटावे, न कंटाळता, न थकता त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य सुरू आहे. हे गेली कित्येक वर्षे अव्यहतपणे सुरू आहे. जनतेला रोज भेटायचे. यात सातत्य आहे. इतका वेळ जनतेच्या कामासाठी भेटीसाठी देणारा नेता, तसा दुर्मीळच म्हणावा लागेल. कोणीही कोणतीही समस्या घेऊन त्यांच्यासमोर उभा राहतो. रस्त्यात समारंभात अडवून त्याच्यांशी बोलू शकतो. असे नेतृत्व सहजासहजी लाभत नाही. ‘दिव्यत्वाची जिथे प्रचीती तिथे कर माझे जुळती,’ अशा नेत्याला 66 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. यापुढेही त्यांची राजकीय भरारी उंच्चच उंच्च व्हावी. ही ईश्वरचरणी प्रार्थना.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा...

मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकारण जवळून पाहिले असता असे दिसते की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे कृतिशील अनुकरण केले आहे. कागलमधील भव्य अश्वारूढ पुतळा, शिवाजी चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरण, छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी, सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मारकासाठी भरघोस निधी, शिवराज्याभिषेकदिनी सहा जूनला शासकीय शिवस्वराज्य दिनाची घोषणा, कागल शहरात शिवछत्रपतींच्या जीवनावर मोफत नाट्य प्रयोग, असे किती तरी काम येथे सांगता येईल. पुढचा जन्म मिळाला तर मला मदारी मेहतरचा मिळावा आणि छत्रपती शिवरायांची सेवा करण्याचे भाग्य मिळावे, असे ते जाहीरपणे सांगतात.

कागलचा भूमिपुत्र...

इतकी वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद असूनही ते कागलमध्येच राहतात. मुंबई, कोल्हापूरला जाऊन स्थायिक व्हावे. असा मोह त्यांना झाला नाही. कागल शहराच्या विकासाकडे त्यांचे सदैव लक्ष आहे. या व्यापातही ते नगरसेवकांची बैठक घेऊन आढावा घेतात. आज हा आमच्या नगरीचा भूमिपुत्र राज्याच्या राजकारणात अढळ स्थानावर पोहोचला आहे. याचा समस्त कागलकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा अभिमान जोपासला आहे. मुश्रीफसाहेबही एक कागलकर याच नजरेने सर्वांकडे पाहत आले आहेत.

-रमेश यशवंत माळी, कागल