शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
3
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
4
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
5
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
6
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
7
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
8
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
10
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
11
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
12
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
13
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
14
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
15
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
16
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
17
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
18
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
19
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
20
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न

कागलचा सांस्कृतिक चेहरा ‘गांधी वाचनालय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:33 AM

वीरकुमार पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कागल म्हटले की राजकीय विद्यापीठ अशा एकाच अंगाने या शहराकडे पाहिले ...

वीरकुमार पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कागल म्हटले की राजकीय विद्यापीठ अशा एकाच अंगाने या शहराकडे पाहिले जाते; पण त्याला मोठा ऐतिहासिक वारसा जसा लाभलेला आहे, तसाच शतकोत्तर सांस्कृतिक चेहराही आहे. त्याची जडणघडण तत्कालीन ‘जनरल नेटिव्ह लायब्ररी’ने केली आहे. हीच लायब्ररी सध्या ‘महात्मा गांधी वाचनालय’ या नावाने ओळखली जाते. या संस्थेला तब्बल १३८ वर्षे पूर्ण झाली असून कागलमधील घराघरांत वर्षानुवर्षे वाचनाची आवड निर्माण करण्यात तिचा मोठा वाटा आहे.ज्या काळात किमान लिहिता-वाचता येईल इतपत शिक्षण घेण्याकडेही लोकांचा कल नव्हता, त्या काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जनक तत्कालीन जहागीरदार जयसिंगराव तथा आबासाहेब घाटगे यांनी १२ नोव्हेंबर १८८० साली ‘जनरल नेटिव्ह लायब्ररी’ची स्थापना केली. त्याचा संपूर्ण खर्च जहागिरीतून देण्याचीही व्यवस्था केली. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे ज्या शाळेत गिरवले ते हिंदुराव घाटगे विद्यामंदिर शहरात असल्याने त्या काळात शिकलेल्यांची संख्या इतर शहरांच्या मानाने चांगली होती. त्यांना वाचनासाठी साहित्य पाहिजे होतेच. यातूनच वाचन चळवळ सुरू होऊन शहराचा सांस्कृतिक चेहरा आकाराला आला. देश स्वतंत्र झाल्यावर २१ फेब्रुवारी १९४८ साली ‘जनरल नेटिव्ह लायब्ररी’चे नामकरण ‘महात्मा गांधी वाचनालय’ असे झाले आणि ६ नोव्हेंबर १९५२ साली शासनाची मान्यता मिळाली. त्यावेळेपासून आजपर्यंत हे वाचनालय पुणे येथील सहायक ग्रंथालय संचालकांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे.सुरुवातीच्या काळात हे वाचनालय कोल्हापूर वेशीजवळ, त्यानंतर काहीकाळ बाजारपेठेतील म. फुले मार्केटमध्ये होते. त्याचवेळी १०० वर्षे पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र शासनाने पाच लाख रुपयांचा निधी दिला. त्यातूनच आता नगरपालिकेजवळ मुख्य रस्त्याला लागून असणारी इमारत बांधण्यात आली. मात्र, ही जागाही अपुरी पडू लागल्यावर नगरपालिकेने खर्डेकर चौकातील हिंदुराव घाटगे विद्यामंदिरमागे असलेली सध्याची इमारत उपलब्ध करून दिली.येथे संदर्भ ग्रंथ, कथा, कादंबरी, लघुकथा, प्रवासवर्णने, आत्मचरित्र, राजकीय लेखमाला यांसह महिला विभाग, बालविभाग अशी स्वतंत्र खुली मांडणी केल्यामुळे वाचकांना आवडीप्रमाणे पुस्तक पाहता येते. त्यातही वाचकांच्या आवडीनिवडी ओळखून येथील कर्मचारी हवी ती पुस्तके ताबडतोब देतात. यामुळेच येथील वाचकांची संख्या प्रत्येकवर्षी वाढतच आहे. यामुळे या वाचनालयाला नेहमी ‘अ’ दर्जा मिळत असून, शासनाने विशेष सन्मानपत्रही दिले आहे.सुसज्ज अभ्यासिकावाचनालयातर्फे २०१२ मध्ये स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली.प्रत्येक वर्षी त्यांना आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ वाचनालय खरेदी करते. येथे सध्या २० पेक्षा अधिक विद्यार्थी अभ्यास करत आहेत. येथील काहीजणांची अधिकारीपदी निवड झाली आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या राज्याभिषेकवर्णनाचे १८९६ सालचे पुस्तकशाहू महाराज १७ मार्च १८८४ साली कोल्हापूरच्या गादीला दत्तक गेले आणि २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाचे वर्णन करणारे ‘मुक्त्यारी समारंभ’ या नावाचे पुस्तक पुढे दोनच वर्षांत १८९६ साली बाळाजी महादेव करवडे यांनी लिहिले. गद्य आणि पद्य रचनेतील हे अतिशय दुर्मीळ पुस्तक या वाचनालयात आहे.दुर्मीळ ग्रंथसंपदा : येथे विनायक कोंडदेव ओक लिखित १८८९ सालचे ‘महन्मणिमाला’, देवराव उखा शेट येरंडोलकर यांचे भास्कराचार्यकृत अंकगणिताच्या मूळ संस्कृत पुस्तकाचे मराठी भाषांतरीत पुस्तक, रावजी श्रीधर गोंधळेकर यांचे १८७८ सालचे कीर्तनरंगी, गजानन चिंतामण देव यांचे १८६७ सालचे अहिल्याबाई होळकर, बाळाजी प्रभाकर मोडक यांचे १८८२ सालचे मुसलमानी राज्याचा इतिहास, आदी अनेक दुर्मीळ पुस्तके सुस्थितीत आहेत.विविध उपक्रमवाचनालयातर्फे ग्रंथ प्रदर्शन, विविध पुस्तकांवर चर्चासत्र आयोजित केले जाते. प्रत्येकवर्षी उत्कृष्ट वाचकाची निवड केली जाते. गणेश जयंतीनिमित्त व्याख्यानमाला घेतली जाते.‘शाहू’कडून रॅकसाठी निधीशाहू साखर कारखान्याने पुस्तके ठेवायला रॅक तयार करण्यासाठी मदत निधी दिला आहे.