शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कागलला आरोग्य अधिकारीच गायब : तालुक्यात प्रभारीवर कामकाज -आरोग्य केंद्रांचे ‘आरोग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 9:36 PM

कागल तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या अंतर्गत ३४ उपकेंदे्र, जिल्हा परिषदेचे दोन दवाखाने यांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा राबविली जाते. एम.बी.बी.एस झालेल्या डॉक्टरांची कमी असलेली संख्या, पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी रुग्णांची अर्थिक

ठळक मुद्देम्हाकवे दवाखाना लहान खोलीतपिंपळगाव आरोग्य केंद्रात रुग्णांची अर्थिक पिळवणूक

जहॉगिर शेख ।कागल : कागल तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या अंतर्गत ३४ उपकेंदे्र, जिल्हा परिषदेचे दोन दवाखाने यांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा राबविली जाते. एम.बी.बी.एस झालेल्या डॉक्टरांची कमी असलेली संख्या, पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी रुग्णांची अर्थिक पिळवणूक, काही उपकेंद्रांवर अधिकाऱ्यांचे गैरहजर राहण्याचे प्रमाण, तालुका आरोग्य अधिकाºयाची रिक्तजागा, कागलचा जि.प.चा दवाखाना नाममात्र, तर म्हाकवे जि.प.चा दवाखाना सुरू होऊन आठ वर्षांहून अधिक काळ लोटला तरी तेथे डॉक्टरही नाही आणि दवाखान्यासाठी स्वत:ची इमारतही नाही, अशा काही नकारात्मक गोष्टी वगळता, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे चांगले कर्तव्य बजावत आहेत, असेच एकूणच चित्र आहे.

कसबा सांगाव, सिद्धनेर्ली, पिंपळगाव बुद्रुक, नानीबाई चिखली, सेनापती कापशी या पाच ठिकाणी ही प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत. तालुक्यात गावांची संख्या ८३ आहे. जि.प. दवाखाने, आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांची संख्या ४१ इतकी आहे. कागल, मुरगूड शहरात शासकीय दवाखाने आहेत. म्हणजे तालुक्याच्या निम्म्या गावात शासकीय आरोग्य यंत्रणा आहे; पण रुग्णांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे. आरोग्य केंद्रात सरासरी साठ ते सत्तर रुग्ण रोज येतात. या दवाखान्यात उपचार करून घेणे म्हणजे कमीपणा, अशी मानसिकता तसेच काही अधिकारी, कर्मचारी हे रुग्णांप्रती दाखवित आसलेला तुसडेपणाही यास कारणीभूत आहे. तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक जागरुकतेमुळे ही प्राथमिक आरोग्य केंद्रे दक्ष असतात. म्हाकवे वगळता सर्व ठिकाणी चांगल्या व सुसज्ज इमारती आहेत.

पाचही ठिकाणी अद्ययावत रुग्णवाहिका आहेत. लोकप्रतिनीधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे औषधेही पुरेशी उपल्ब्ध असतात. गरोदर महिलांसाठी राबविण्यात येणाºया योजनेसाठी खासगी डॉक्टरांच्याशी करार केले आहेत. कोल्हापूर जवळ असल्यामुळे कागल तालुक्यात सेवा बजावण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात; पण शासनाच्या धोरणामुळे या जागा रिक्तआहेत. प्रत्येक केंद्रावर दोन एम.बी.बी.एस. डॉक्टरच पदे मंजूर आहेत; पण एकावरच काम चालले आहे. डॉ. अजय गवळी यांची बदली होऊन एक वर्ष झाले तरी तालुका आरोग्य अधिकारी हे पद रिक्तच आहे. सिद्धनेर्ली केंद्राचे डॉ. श्रेयस जुवेकर हे प्रभारी म्हणून हा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. अलीकडच्या काळात चिमगाव, यमगे, लिंगणूर दुमाला, क. सांगाव, कागल अशा काही गावात साथीच्या आजाराची साथ आली होती; पण याला ग्रामपंचायतीचे धोरण कारणीभूत असते. आम्ही याबद्दल सावध करूनही काही ग्रामसेवक, ग्रामपंचायती दखल घेत नसल्याची खंत या विभागाने व्यक्तकेली आहे.केंद्र पातळीवर सन्मान आणि बट्टाहीचिखली प्राथमिक आरोग्य केंद्राने चांगली कामगिरी बजावत २0१५ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील आय.एस.ओ. समजले जाणारे ' एन.ए.बी.एच.' हे मानांकन प्राप्त केले आहे. विविध आरोग्य योजना राबविण्यात कागल तालुका आघाडीवर आहे. मात्र, दोन महिन्यांपूर्वी पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांकडून पैसे उकळण्याचे प्रकार होतात, अशी तक्रार पंचायत समितीकडे आली होती. चांगल्या कामाला असा बट्टा लावण्याचे काम काहीजण करतात, असा हा प्रकार आहे. हा विषय दडपला गेला आहे. रजा न दाखवता गैरहजर राहणे, न झालेले दौरे दाखविण्याचेही प्रकार होतात. 

जि.प. दवाखाने ‘असून अडचण... नसून खोळांबा...’मुरगूड शहरासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यामुळे तेथे त्याआधी कार्यरत असलेला जिल्हा परिषद दवाखाना म्हाकवे गावात वर्ग करण्यात आला. आठ वर्षे झाली तरी या दवाखान्फाला स्वतंत्र इमारत नाही.ग्रामपंचायतीने दिलेल्या एका खोलीत दवाखाना आहे. आजही तेथे स्वतंत्र डॉक्टर नाही. एक औषध निर्माण कर्मचारी, एक परिचारिका हा दवाखाना चालवितात. ही गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे, या गावात आरोग्य उपकेंद्रही आहे. तिची स्वतंत्र इमारत आहे. कागल शहरातील जि.प, दवाखाना तर 'हेरिटेज 'वास्तू बनून राहिला आहे. 

कागल तालुका आरोग्य यंत्रणा राबविण्यात पहिल्या पाचमध्ये आहे. डॉक्टरांची संख्या कमी आहे; पण तो राज्यभरातील प्रश्न आहे. औषधसाठा पुरेसा आहे. पिंपळगाव आरोग्य केंद्रात पैसे मागण्याच्या प्रकाराची चौकशी सुरू आहे. गेल्या नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत तालुक्यातील जवळपास साठ हजार विद्यार्थ्यांना गोवर रुबिलाचे लसीकरण केले. इतर ठिकाणच्या तुलनेत कोठेही गुंतागूंत झाली नाही. कारण योग्य प्रशिक्षण व नियोजन झाले होते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत तालुका जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर आहे.- डॉ. श्रेयस जुवेकर, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरgovernment schemeसरकारी योजना