शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

राधानगरीत चांदण्यांच्या साक्षीने काजव्यांचा प्रकाशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 12:25 AM

पर्यटकांची गर्दी : पावसाळ्यापर्यंत चालणार रोज महोत्सव

आॅनलाईन लोकमत/संदीप आडनाईककोल्हापूर : राधानगरी-काळम्मावाडीच्या जंगल परिसरात श्ुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्र्यत राज्यातून आलेल्या पर्यटकांनी विविध झाडांवर चमकणाऱ्या काजव्यांचा चांदण्यांच्या साक्षीने प्रकाशोत्सव अनुभवला. चित्रपट, मालिकेत दाखविण्यात आलेले हे चमकणारे काजवे प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटकांनी तुंबळ गर्दी राधानगरीत झाल्याने हा एक झगमगता इव्हेंटच झाला होता. पहिला पाउस पडेपर्यंत हा काजवा महोत्सव रोज चालणार आहे.

राधानगरी येथील बायसन नेचर क्लब या संस्थेमार्फत २६ मे पासून काजवा प्रकाशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, अजितदादा पवार यांच्या मातोेश्री आशाताई पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी केले.

सायंकाळी ७ ते रात्री १0 या वेळेत काजव्यांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची पदभ्रमंती, चांदण्या रात्री सहकुटूंब स्नेहभोजन, करमणुकीच्या अशा या काजवा महोत्सवात विविध ठिकाणहून आलेल्या पर्यटकांनी भाग घेतला आहे. पहिला पाउस पडेपर्यंत हा महोत्सव रोज अनुभवता येणार आहे.

जैवविविधेतमध्ये महत्वाच्या आणि दुर्मिळ होत चाललेल्या काजव्यांचे दर्शन ही अनोखी अनुभूती शुक्रवारी रात्री पर्यटकांनी अनुभवली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवडयापासून पहिल्या पावसाचे आगमन होईपर्यंत राधानगरी, दाजीपूर, काळम्मावाडी या जंगल परिसरातील असंख्य झाडांवर हे काजवे चमकताना दिसतात. याच काळात काजवे नैसर्गिकरित्या आपल्या प्रकाशाने जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. निसर्गातील अत्यंत अद्भूत असा हा कीटक राधानगरीसारख्या जंगल परिसरात चमकताना आढळतो. दाजीपूर, राधानगरी, काळम्मावाडी जंगल परिसरातील हिरडा, बेहडा, अंजनी, जांभूळ, आंबा, उंबर, करंज या निवडक झाडांवरच हा काजव्यांचा थवा पाहण्यास आढळतो. काजव्यांचा हा तात्पुरता आशियाना अतिशय देखणा आणि विलोभनीय दिसतो आहे.