शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोल्हापुरातील कळंबा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात; सांडपाणी, मैलामिश्रित रसायनयुक्त पाणी तलावात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 3:38 PM

तलाव परिसरात सायलेंट नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर हॉटेल्सचा गराडा

अमर पाटीलकळंबा : १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा कळंबा तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षाने प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचा नैसर्गिक रंग बदलून पाणी हिरवट पडले असून पाण्याचा उग्र वास येत आहे. तलावातील पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे, कपडे धुणे निर्माल्य टाकणे यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे.पालिका मालकीच्या कळंबा तलावाच्या हद्दीतील २० एकरात अतिक्रमण करत शेतकऱ्यांनी शेती सुरू केली असून शेतातील रसायनयुक्त पाणी पावसाळ्यात झिरपून तलावात मिसळत आहे. त्यामुळे तलावात रोज प्रदूषणाची भर पडत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या ऑपरेटिंग झु ट्रस्टने कुळांना कसायला दिलेल्या कात्यायनी पार्कातील जमिनीवर बेकायदेशीर नागरी वस्त्या निर्माण झाल्या असून शौचालये नसल्याने नैसर्गिक ओढ्याचा वापर शौचालयासाठी केला जात आहे. याचे मैलामिश्रित पाणी थेट तलावात मिसळते. तलाव देखभालीसाठी पालिकेचा कर्मचारी नियुक्त नसल्याने तलाव परिसर मद्यपी जेवणावळीचा अड्डा बनला असून याचा घनकचरा थेट तलाव पात्रात टाकला जातो. तलाव परिसरात सायलेंट नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर हॉटेल्सचा गराडा पडला असून याचाही कचरा तलावात टाकला जातो.

परिणामी पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढून विषारी जलपर्णी फोफावत आहेत. तलावातील प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी प्रचंड नाहक खर्च होत आहे तरीही पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने आता प्रदूषणमुक्तीसाठी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२० लाख पाण्याततलावाजवळ २० लाखांचा चुराडा करून जनावरे धुण्यासाठी हौद बांधण्यात आला आला. मात्र, हौदात पाणीच नसल्याने जनावरे थेट तलावात सोडली जातात. तर हौद कचरा साठवण्याचा अड्डा बनला आहे.

तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. -अरुण पाटील, सुर्वेनगर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीpollutionप्रदूषण