कोल्हापूर : स्पेशल पोक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षे शिक्षा भोगणाऱ्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा रविवारी रात्री कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. जिवाजी रामचंद्र साळुंखे (वय ८० रा. मजरेशेंबडी, ता. जावळी, जि. सातारा) असे त्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोक्सो कायद्यांतर्गत जिवाजी साळुंखे हा कळंबा कारागृहात जानेवारी २०१८ पासून न्यायालयीन बंदी होता. याप्रकरणी त्याला दि. १६ फेब्रुवारी २०१२ मध्ये सातारा जिल्हा विशेष न्यायालयाने दहा वर्षे व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याप्रकरणी तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. मेंदूच्या आजारामुळे ते अशक्त बनल्यामुळे त्याला दि. २५ एप्रिलला प्रथम सेवा रुग्णालयात व नंतर प्रकृती बिघडल्याने खासगी रुग़्णालयात औषधोपचार सुरू होते. उपचार सुरू असताना रविवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.