कोल्हापूर : औरंगाबाद येथे मराठा समाजातील कार्यकर्त्याने घेतलेल्या जलसमाधीनंतर सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या मंगळवारच्या ‘महाराष्टÑ बंद’ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.ठिकठिकाणी मोटारसायकल रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शनेकरण्यात आली. दिवसभरात आंदोलकांनी नऊ एस. टी. बसेसच्या काचा फोडल्या. यात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. एसटी बसेसच्या सुमारे ८४६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचेही हाल झाले. सकाळपासून या आंदोलनाची धग सायंकाळपर्यंत कायम राहिली. सकाळी दहा वाजल्यानंतर आंदोलक रस्त्यावर येतील तसे त्यांनी प्रथम एस. टी. बसेसना लक्ष्य बनविले. दिवसभरात नऊ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या.याचा परिणाम कागल, कुरुंदवाड व गारगोटी आगाराच्या कार्यक्षेत्रांत प्रामुख्याने जाणवला.सकल मराठा समाजाच्या उसळलेल्या आंदोलनात मंगळवारी औरंगाबाद जिल्'ात खासदार चंद्रकांत खैरे यांना धक्काबुक्की झाल्यानंतर राज्य शासनाने मंत्र्यांच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढविला; त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील नाळे कॉलनी परिसरातील निवासस्थानासमोर सायंकाळी पोलीस गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.कोल्हापुरात बेमुदत ठिय्या आंदोलनऐतिहासिक दसरा चौक येथे मंगळवारपासून सुरू झालेले ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही, असा ठाम निर्धारही करण्यात आला. आतापर्यंत मूक आंदोलने केली, सरकारला जाग आली नाही; यापुढे ‘ठोक’ आंदोलन केले जाईल. तरीही दखल घेतली नाही तर मात्र एक दिवस मराठा तरुण हातात तलवारीही घेऊ न रस्त्यांवर उतरतील, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला.वारकºयांच्या बसेसना संरक्षणवारकºयांना घेऊन येणाºया बसेसवरही दगडफेक होऊ लागली. परिणामी जयसिंगपूर पोलिसांनी १२ एस. टी. बसेस पोलीस बंदोबस्तात कोल्हापुरात आणून सोडल्याने वारकºयांनी निश्वास सोडला.
कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद; नऊ बसेस फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:54 AM