शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Kolhapur Lok Sabha Result 2024: कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आघाडीवर

By पोपट केशव पवार | Published: June 04, 2024 8:43 AM

Kolhapur Lok Sabha Result 2024 कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आघाडीवर

कोल्हापूर : Kolhapur Lok Sabha Result 2024 जिल्ह्यात लोकसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) यांनी आघाडी घेतली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात  शाहू छत्रपती यांनी आघाडी घेतली आहे.  दरम्यान, ९ हजार १०३  पोस्टल मताची मोजणी सुरू झाली आहे. तर,  हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील-सरुडकर यांनी आघाडी घेतली आहे.

महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यात मुख्य लढत आहे. मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी मतमोजणी केंद्र परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.निकालाआधीच झळकले शाहू छत्रपतींचे फलककोल्हापूर : निकालाला एक दिवस बाकी असतानाच कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती यांच्या विजयाचे फलक उभारण्यात आले आहेत. वारे वसाहतीमध्येही असाच फलक उभारण्यात आला असून, महत्त्वपूर्ण दसरा चौकातही भल्या मोठ्या हाेर्डिंगवर छत्रपतींचा फलक उभारण्यात आले आहेत. कोल्हापुरातून २३ तर हातकणंगलेत २७  उमेदवार रिंगणातकोल्हापूरला एकूण २३ उमेदवार रिंगणात होते; परंतु मुख्य लढत महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती आणि महायुतीचे खासदार संजय मंडलिक यांच्यात झाली. हातकणंगलेत २७ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील, महायुतीचे खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातच झाली. निकालाकडे राज्याचे लक्ष दोन्ही मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर पाचवेळा कोल्हापूरला आले व आठ दिवस त्यांचा मुक्काम होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. कोल्हापूरचे शाहू छत्रपती रिंगणात असल्याने देशाचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीsanjay mandlikसंजय मंडलिकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेना