येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात प्राचार्य पोवार यांच्या ‘कर्मवीर रावसाहेब डी. आर. भोसले चरित्र व कार्य’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. इतिहास संकलन समितीचे अध्यक्ष डॉ. बी. डी. खणे, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. टी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. शाहूंच्या विचारांनी प्रभावित होऊन ब्रिटिशांच्या काळात नाशिक आणि कोल्हापूरमध्ये कर्मवीर भोसले यांनी समाजपरिवर्तनासह विविध क्षेत्रांत मोलाचे कार्य केले. त्यातून बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक क्षेत्रात बळ मिळाले. त्यांनी रूजविलेल्या विचारांनुसार आजही कार्य सुरू आहे. पुरोगामी विचारांना कितीही विरोध झाला, तरी हे विचार रूजविणाऱ्या राजर्षी शाहू, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या चळवळी कधीही हरवणार नसल्याचे ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी सांगितले. बहुजन समाजाला शिक्षण, सहकार, आर्थिक, सामाजिक स्वरूपात बळ देणारे डी. आर. भोसले हे खऱ्याअर्थाने कर्मवीर होते. त्यांनी शाहूंचा विचार ताकदीने पुढे नेत विविध संस्थांच्या माध्यमातून तो समाजात रूजविला. त्यांचे चरित्र, कार्य हे डॉ. पोवार यांनी चांगल्या संदर्भासह नव्या पिढीसमोर मांडले असल्याचे डॉ. बी. डी. खणे यांनी सांगितले. डी. आर. भोसले यांचे चरित्र लिहिताना डॉ. पोवार यांनी प्रत्येक वाक्याला संदर्भ दिला आहे. हे ऐतिहाासिक पुस्तक संशोधनाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ते पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे, असे डॉ. टी. एस. पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमात बस्तवडे ग्रामस्थांनी डॉ. पोवार यांचा सत्कार केला. अर्जुनी येथील उपक्रमशील शिक्षक नामदेव चौगुले यांचा सत्कार संयोजकांनी केला. यावेळी इस्माईल पठाण, चंद्रकांत यादव, विजय औताडे, शाहीर राजू राऊत, आदी उपस्थित होते. डॉ. पोवार यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका कांबळे, अस्मिता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. छाया पोवार यांनी आभार मानले.