बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात दुपारी ११ वाजेपर्यंत सरासरी २६ टक्के मतदान झाले आहे. आज सकाळपासूनच मतदानासाठी या जिल्ह्यात उत्साह दिसून येत आहे.आज सकाळी मतदान सुरु होताच मतदारांनी प्रचंड संख्येने रांगा लागल्या आहेत. बेळगावकर मतदारांनी मतदान केंद्रांकडे धाव घेत दुपारपर्यंत मतदानाचा वेग वाढविण्यावर भर दिल आहे. त्यामुळे सकाळपासून बेळगाव शहरासह उपनगरातही रांगा वाढत आहेत.सीमाभागातील चार विधानसभा मतदारसंघ मराठींसाठी महत्वाचे मानले जातात. बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर. या चारही मतदारसंघात मतदानाचा वेग दुपारपर्यंत कमालीचा होता. मतदार उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.बेळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १८ जागा असून येथे ३७ लाख ३७ हजार मतदार आहेत. त्यापैकी महिलांची संख्या १८ लाख ३४ हजार असून पुरुष मतदारांची संख्या १८ लाख ८८ हजार इतकी आहे. या जिल्ह्यात ४४१६ मतदान केंदे्र आहेत, त्यातील ८३६ अति संवेदनशील आहेत. या १८ मतदार संघात २0३ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी १८४ पुरुष तर १९ महिला आहेत. या केंंद्रांवर २४२८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बेळगाव उत्तर मतदारसंघात सकाळी ९ वाजे पर्यंत १२ टक्के तर ११ वाजेपर्र्यत २८ टक्के मतदान झाले. बेळगाव दक्षिण मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंंत २२.१८ टक्के मतदान झाले. सकाळी ९ वाजेपर्यंत येथे १0 टक्के मततदान झाले होते. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत १२ टक्के मतदान झाले होते, मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत मतदान वाढले. या मतदारसंघात २२.७0 टक्के इतके मतदान झाले. खानापूर मतदारसंघातून ११ वाजेपर्यंत २६.६0 टक्के इतके मतदान झाले आहे.बेळगाव ग्रामीणमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर किणेकर, काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, भाजपचे संजय पाटील, बेळगाव दक्षिण समितीचे किरण सायनाक, भाजपचे अभय पाटील, कॉंग्रेसचे एम. डी. लक्ष्मी नारायण, मध्यवर्ती समितीचे प्रकाश मरगाळे तर खानापुरातून समितीचे विलास बेळगावकर, काँग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर, जे. डी. एस.चे नासिर बागवान, भाजपचे विठ्ठल हलगेकर,मध्यवर्ती समितीचे अरविंद पाटील ,बेळगाव उत्तर मतदारसंघातून कॉंग्रेसचे फिरोज सेठ, भाजपचे अनिल बेनके, समितीचे बाळासाहेब काकतकर रिंगणात आहेत.
Karnataka Assembly Elections 2018 सीमाभागात ११ वाजेपर्यंत सरासरी २६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 1:01 PM
बेळगाव जिल्ह्यात दुपारी ११ वाजेपर्यंत सरासरी २६ टक्के मतदान झाले आहे. आज सकाळपासूनच मतदानासाठी या जिल्ह्यात उत्साह दिसून येत आहे.
ठळक मुद्देसीमाभागात ११ वाजेपर्र्यत सरासरी २६ टक्के मतदानरांगा वाढल्या : मतदार उत्साहाने करताहेत मतदान