कोल्हापूर : कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील पक्षकारांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंच होणे गरजेचे आहे. खंडपीठ कृती समितीच्या मागणीला पाठिंबा आहे, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी व्यक्त केले. मंगळवारी (दि. ३१) कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी ते बोलत होते.मूळचे निपाणी येथील प्रसन्ना बी. वराळे यांची नुकतीच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी निवड झाली आहे. जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. बार असोसिएशनच्या वतीने कोल्हापुरात मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या नवोदित वकिलांच्या मागर्दशन शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्य न्यायमूर्ती वराळे यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. विवेक घाटगे, माजी अध्यक्ष अजित मोहिते, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, सचिव विजयकुमार ताटे-देशमुख, ॲड. संपतराव पवार आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात सर्किट बेंच गरजेचे, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 2:26 PM