शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

बेळगाव : कर्नाटक पोलिसांचा मराठी युवकांवर लाठीमार : बेळगावात काळा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:19 AM

‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल मे’, ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत हजारो मराठी भाषिकांनी काळा दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, मूक सायकल फेरी गोवा वेस सर्कलजवळ आली

ठळक मुद्दे‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला; मूक सायकल फेरी

बेळगाव : ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल मे’, ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत हजारो मराठी भाषिकांनी काळा दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, मूक सायकल फेरी गोवा वेस सर्कलजवळ आली असताना टिळकवाडीकडून राज्योत्सव साजरा करायला जाणारे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी कर्नाटक पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी मराठी तरुणांना यावेळी लक्ष्य केल्याचा आरोप केला.

शहरातून काळा दिनाचा एकच झंझावात झाला. हजारोंच्या संख्येने युवक आणि महिलांनी सहभाग घेतला. उपमहापौर मधुश्री पुजारी यांचा सहभाग आणि शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सहभागाने ही फेरी यशस्वी झालीे. गुरुवारी सकाळी ९ वाजता या फेरीस धर्मवीर संभाजी उद्यान येथून सुरुवात झाली. यामध्ये कोल्हापुरातून शिवसेनेचे विजय देवणे सहभागी झाले होते.

लोकशाही आणि न्यायाच्या मार्गाने १ नोव्हेंबरला मूक सायकल फेरी काढण्यात येते, पण यंदा सकाळपर्यंत या फेरीस परवानगी मिळालेली नव्हती. सकाळी सात वाजता परवानगी देण्यात आली. त्यामुळे उपस्थिती कमी होईल, असे वाटत होते. तरीही हजारो तरुण यामध्ये सहभागी झाले होते.

मध्यवर्ती महाराष्ट एकीकरण समितीचे नेते परवानगीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात रात्रभर बसून होते, पण परवानगी मिळाली नव्हती. बुधवारी परवानगी मागायला गेलेल्या नेत्यांना प्रत्येकी पाच लाखांचे हमीपत्र आणून द्या, असे पोलिसांनी सांगितले होते. त्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. यावर आज, शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.लाठीमाराचे गालबोटफेरी शेवटच्या टप्प्यात गोवावेस येथे आली असताना काही कार्यकर्त्यांनी गैरसमजातून फटाके फोडून पोलिसांवर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला; पण या लाठीमाराचे गालबोट रॅलीस लागले.बेळगावात गुरुवारी काळा दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मराठी भाषिकांनी ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल मे’, ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा दिल्या. या फेरीत हजारोंच्या संख्येने तरुण आणि महिलांनी सहभाग घेतला होता.बेळगावात आयोजित मूक सायकल फेरीवेळी मराठा युवकांवर कर्नाटक पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र