लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे - गेल्या दोन दिवसापासून करवीर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. प्रमुख मार्गावर असलेल्या नद्यांच्या पुलावर व बंधाऱ्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. करवीर तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या २५ ते ३० गावांचा यामुळे संपर्क तुटला आहे.
गेले दोन दिवस मुसळधार पावसानेे तालुक्यातील भोगावती कुंभी, तुळसी, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. करवीर तालुक्यात मागील वर्षी सरासरी ६०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ती ८४० मिलीमीटर नोंद झाली आहे. तुलनेने यावर्षी सरासरी २३६ मिलीमीटर जास्त पावसाची नोंद झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी पावसाची नोंद झालेली नव्हती. पण यावर्षी तब्बल १३७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. महे बीड, कोगे कुडित्रे या मोठ्या पुलासह दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर, अनेक ओढ्यावरील पूल बुधवारी दिवस-रात्र प्रचंड पाऊस झाल्याने वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
फोटो १) महे-बीड दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे. २) दोन दिवस पडकुंभी नदीला आलेला पूर.
२२ महेबीड पूल