कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या सणाच्या निमित्ताने शनिवारी कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीस फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची सजावट करण्यात आली.कोल्हापूरच्या अंबाबाई देवीस अनेक भाविक साडी, श्रीफळ अर्पण करत असतात. अक्षय तृतियेच्या निमित्तानेही शनिवारी देवीस अनेक भाविकांनी फळांचा राजा हापूस आंबा अर्पण केले. भाविकांकडून आलेल्या सुमारे ५०० ते ६०० आंब्यांची देवीला आरास करण्यात आली होती. ही आरास पाहण्यासाठी भक्तांची मोठी रांग होती. त्यामुळे अंबाबाईच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरूप प्राप्त झाले. या आंब्याच्या सजावटीमुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे रूप अधिकच खुलून दिसत होते.देवीची हिंदोळ्यावर बसलेल्या स्वरुपातील पूजा मयूर मुनीश्वर, सुकृत मुनिश्वर, साेहम मुनिश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली होती, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.
Kolhapur News: अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर अंबाबाई देवीस हापूस आंब्यांची आरास
By संदीप आडनाईक | Published: April 22, 2023 6:09 PM