शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

शिवरायांना करवीरकरांचा मुजरा

By admin | Published: February 20, 2017 12:26 AM

शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम : पक्ष, संघटना, शाळा, संस्था, तरुण मंडळे, तालीम मंडळांतर्फे प्रतिमापूजन, पुतळापूजन

कोल्हापूर : हिंदवी स्वराज्य-संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध पक्ष, संघटना, शाळा, संस्था, वाचनालये, तरुण मंडळे, तालीम मंडळांतर्फे प्रतिमापूजन, पुतळापूजन, व्याख्यानांचे आयोजन, जिलेबी वाटप, सामाजिक उपक्रम, आदींंद्वारे रविवारी शिवरायांना अभिवादन करण्यात आले.मंगळवार पेठ मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी येथे सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांच्या हस्ते शिवप्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी बाबूराव चव्हाण, उमेश पवार, अनिकेत सावंत, अमोल गायकवाड, स्वप्निल पार्टे, ओंकार नलवडे, पप्पू नारंगकर, प्रशांत जाधव, अतिम बेलेकर, जितेंद्र पाडेकर, राजू वर्णे, रामदास पाटील, अनिकेत पाटील, नीलेश गायकवाड, सुहास भोला, महेंद्र साळोखे, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते. तसेच जिलेबी वाटप करण्यात आले. यावेळी शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला. करवीर नगर वाचन मंदिरकरवीर नगर वाचन मंदिर येथे हिशेब तपासणीस दीपक गाडवे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जोशी, सहकार्यवाह प्रशांत वेल्हाळ, संचालक अ‍ॅड. केदार मुनीश्वर, उदय सांगवडेकर, कार्यवाह सतीश कुलकर्णी, ग्रंथपाल मनीषा शेणई, आदी उपस्थित होते.परिवर्तन फाउंडेशनपरिवर्तन फाउंडेशनतर्फे शिवाजी पेठेतील वेताळ गार्डन येथे अ‍ॅड. पंडित सडोलीकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अमोल कुरणे, उपाध्यक्ष रवी कोल्हटकर, मनीषा घुणकीकर, जगन्नाथ कुरणे, सन्मित कांबळे, अशोक बावडेकर, संभाजी कांबळे, अंजना धनवडे, पूनम कुरणे, अनुसया कांबळे, शोभा कांबळे, लता कांबळे, निवास कांबळे, अनिल पटवणे, आदी उपस्थित होते.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या कार्यालयात प्रा. शहाजी कांबळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सुखदेव बुध्याळकर, अविनाश अंबपकर, संजय जिरगे, गुलाब शिर्के, बाजीराव जैताळकर, दिलीप कोथळीकर, आदी उपस्थित होते.महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळाश्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळेत अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते शिवप्रतिमापूजन झाले. त्यानंतर जिलेबी वाटण्यात आली. यावेळी संचालक, कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे बालसंकुलला औषधेशिवजयंती निमित्त नागाळा पार्कातील महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळातर्फे शिये येथील करुणालय बालसंकुलाला औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच क्रीडाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल युगंधरा शिर्के, जयश्री बोरगे, श्रावणी झेंगटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, प्रा. मंजूश्री घोरपडे, डॉ. सचिन पाटील, डॉ. सुनीता पाटील, सतीश चव्हाण, आनंद बनसोडे, उपस्थित होते.एस. टी. महामंडळएस. टी. विभागीय कार्यशाळेत यंत्र अभियंता एस. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रताप तराळ, कृष्णा पाटील, राजू परांडेकर, सुनील कदम, सदा भालकर, अरुण कांबळे, रवी माने, तकदीर इचलकरंजीकर, दत्ता शिंगण, सुदेश कदम, प्रशांत कांबळे, आनंदा कांबळे, व्ही. आर. केसरकर उपस्थित होते.म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूलभोसलेवाडी येथील म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक शशिकांत सावंत यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नेहा शिंदे, आकाश लायकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. सरदार आंबर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. बी. व्ही. यादव यांनी आभार मानले. त्र्यंबोलीदेवी हायस्कूलउचगाव येथील त्र्यंबोलीदेवी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आर. डी. शिंत्रे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन क रण्यात आले होते. त्याचे परीक्षण डी. ए. जाधवर यांनी केले. आर. बी. मणेर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली. डी. एस. पाटील यांनी आभार मानले.कळंबा गर्ल्स हायस्कूलमध्ये मावळ्यांच्या वेषात विद्यार्थीकळंबा गर्ल्स हायस्कूलमध्ये मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ओंकार पाटील यांनी पोवाड्यातून हिंदवी स्वराज्य-संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची महती गाऊन वातावरण शिवमय केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या वेषात नेत्रा पोवार, तर इतर विद्यार्थिनी मावळ्यांच्या वेशात आल्या होत्या. मुख्याध्यापिका एस. ए. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डी. जी. पाटील यांनी क ार्यक्रमाचे संयोजन केले. आर. आर. चौगले यांनी आभार मानले.आर्य क्षत्रिय समाजआर्य क्षत्रिय समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष बाळकृष्ण सूर्यवंशी यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सतीश करजकर, ज्येष्ठ संचालक भानुदास सूर्यवंशी, विजय बुधले, मनीष माने, संगीता सूर्यवंशी, नेहा चव्हाण, आदी उपस्थित होते.नानासाहेब गद्रे हायस्कूलतोरणानगर येथील नानासाहेब गद्रे हायस्कूलमध्ये प्रा. दिनकर नांगरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी इयत्ता आठवीमधील विद्यार्थिनींनी शिवजन्माचा पाळणा गायला. एस. पी. शिरोळकर यांनी शिवचरित्रामधील ठळक माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. एस. एस. चोरमारे यांनी प्रास्ताविक केले. एस. एस. बेलवलेकर यांनी आभार मानले.प्रबुद्ध भारत हायस्कूललक्षतीर्थ वसाहत येथील प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका षण्मुखा अर्दाळकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त शाळेतील विद्यार्थी पीयूषा ओतारी, मीनल गोसावी, अमिना भाटकर, संपदा घोळसे, श्रेयस पोवार यांनी मनोगत व्यक्त केले; तर मानस पन्हाळकर, हर्षवर्धन सुतार यांनी पोवाडा सादर केला. आदित्य सूर्यवंशी याने सूत्रसंचालन केले. अनुष्का अर्दाळकरने प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे नियोजन उषा कोल्हे, कोमल पाटील यांनी केले. जयभारत हायस्कूलरुईकर कॉलनी येथील जयभारत हायस्कूलमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन हर्षल सुर्वे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थाध्यक्ष पी. एस. जाधव उपस्थित होते. यावेळी मिरवणुकीचे उद्घाटन मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश पाटील, उपाध्यक्षा सुमिता जाधव, संचालिका अश्विनी पाटील, मुख्याध्यापक संजय पाटील, पी. एस. घाटगे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका महापालिकेतर्फे राजर्षी शाहू सभागृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास महापौर हसिना फरास यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर, स्थायी समितीचे सभापती संदीप नेजदार, नगरसेविका रूपाराणी निकम, नगरसेवक अशोक जाधव, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, आदी उपस्थित होते. शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलकोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका कमल कांबळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापिका उषादेवी देशमुख, नेहा कानकेकर, संजय सौंदलगेकर, महंमद मुजावर, बाळाराम लाड, आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळ रविवार पेठ, बिंदू चौक येथील कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळ, स्वातंत्र्यसैनिक संघटना, कोल्हापूर जिल्हा खादी व म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूल, समता विद्यामंदिराच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेचे पूजन खादी संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व्ही. डी. माने, दादासाहेब जगताप, एस. एस. तुपद, बी. एस. शिंगे, प्रा. आशा कुकडे, गीताताई गुरव, स. तु. सुतार, अप्पासाहेब देसाई, पी. के. पाटील, प्रा. सुजय देसाई, सचिन पाटील, गणेश ओतारी, अमोल पाटील, संदीप शिंगे, योगेश पाटोळे, आदी उपस्थित होते. क्रिकेट बॉईजसोमवार पेठ, साळी गल्ली येथील क्रिकेट बॉईज संघातर्फे शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवराज भोसले, प्रतीक चव्हाण, हृषिकेश गोसावी, सुहास सदलगे, सम्मेद मुधाळे, यश गायकवाड, शिवकुमार चव्हाण, आदी उपस्थित होते. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसशिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन संस्था चेअरमन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. सी. एम. गायकवाड, ए. व्ही. जाधव, डी. एस. चौगले, एस. एम. सदलगी व अन्य सेवक उपस्थित होते. कैलासगडची स्वारी मंदिरमंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात शिवजयंतीनिमित्त शिवप्रतिमेस अध्यक्ष बबेराव जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा कॉँग्रेस कमिटीत अभिवादनकोल्हापूर शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटी (आय)मध्ये शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी एस. के. माळी, किशोर खानविलकर, किरण मेथे, चंदा बेलेकर, प्रदीप चव्हाण, जी. टी. पाटील, लीला धुमाळ, अशोक गायकवाड, अन्वर शेख, नारायण लोहार, डी. एस. शिलेदार, हॉ. प्रमोद बुलबुले, यशवंत थोरवत, एम. जी. पाटील, रामदास व्हटकर, मोहन शिंदे, दयानंद देसाई, आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाच्या वतीने महापौर हसिना फरास यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आदिल फरास, अनिल कदम, अमोल माने, जहिदा मुजावर, सुहास साळोखे, महादेव पाटील, समीर जमादार, रियाज कागदी, लालासाहेब जगताप, सुनील देसाई, सुनीता राऊत, पूनम सुळगावकर, जोतिराम बाचूळकर, मोहसीन पठाण, शीतल तिवडे, प्रकाश पांढरे, किशोर माने, युवराज साळोखे, नागेश फरांडे, अमोल मधाळे, मोहसीन पठाण, सुमन वाडेकर, संध्या भोसले, गणपतराव बागडी, राजहंस सोनवणे, प्रशांत पाटील, बी. के. भास्कर, नागेश जाधव, पांडुरंग मोहिते, प्रभाकर पाटील, आनंदराव पोलादे, जहाँगीर अत्तार, प्राची तळवळकर, रेखा आवळे, आदी उपस्थित होते. बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्थाकोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंत साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष भीमराव गोसावी यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपाध्यक्ष अण्णा पाटील, संचालक रंगराव मांगोलीकर, नंदकुमार कांबळे, हिंदुराव पनोरेकर, रामचंद्र गडकर, राहुल माणगावकर, रवींद्र मोरे, सर्जेराव माने, सुजाता भास्कर, विकास कांबळे, रघुनाथ मांडरे, प्रकाश पोवार, आदी उपस्थित होते. मिस क्लार्क हॉस्टेलशाहू जनता शिक्षण संस्था संचलित मिस क्लार्क हॉस्टेल व ब्लू बर्ड इंग्लिश स्कूलतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे रमेश पंडत यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. नानासाहेब माने, सचिव दीपक कांबळे, राजेश माने, वसतिगृहाचे अधीक्षक सुधाकर विणकरे, महानंदा विणकरे, रेखाताई कांबळे, माया कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)