शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कोल्हापूरचे कास पठार; किटवडेत बहरला रानफुलांचा सुगंध, विविध प्रजातींच्या फुलांनी पर्यटक आकर्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:10 PM

प्रतिचेरापुंजी म्हणून ओळख असलेले पावसाचे गाव

सदाशिव मोरेआजरा : औषधी वनस्पती, मुबलक जैवविविधता व निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला आजरा तालुका आहे. पावसाळ्यात दररोज अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने प्रती चेरापुंजी म्हणून ओळख असलेला किटवडेचा सडा सध्या रंगीबेरंगी रानफुलांनी बहरला आहे. कोल्हापूरचे प्रती कासपठार म्हणून याठिकाणाची ओळख होत आहे. विविध प्रजातीची ही रानफुले आपल्या मनमोहक सुगंधाने पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.आजरा तालुक्याला निसर्गाची अव्दितीय जैवविविधता लाभली आहे. स्थानिक नागरिकांनी मिळालेली निसर्गसंपदा सुस्थितीत आजपर्यंत राखून ठेवली आहे. त्यामुळे येथील परिसरात दुर्मिळ ते अतिदुर्मिळ जलचर, उभयचर प्राणी, वनस्पती, पक्षी, कीटक, रानफुली रानभाज्या व रानफळे सहज आढळून येतात. त्यामुळे किटवडे ( ता . आजरा ) परिसर पर्यटकांबरोबरच, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी यांना आकर्षित करीत आहे.

आजरा आंबोली रस्त्यावर घाटकरवाडीपासून तीन कि.मी.अंतरावर हा किटवड्याचा सडा आहे. या ठिकाणी आता पांढरी, निळसर, पिवळी, गुलाबी अशा विविध प्रकारची रानफुले बहरली आहेत. म्हणूनच जैवविविधतेने समृद्ध असलेले गाव म्हणून किटवडेचा उल्लेख राज्यभर केला जातो.

पठारावर फुललेली प्रजातीनुसार रानफुलेसीतेची आसवे असणारी निळसर फुले, सोनसळीची पिवळी फुले, गुलाबी तेरडा, पेवची पांढरी फुले, भुई चापा, अत्तर काढण्यासाठी वापरली जाणारी सुरंगीची फुले, सुंदर वास असणारी अंजनीची निळसर फुले. तर सात वर्षांनी फुललेली बकरा वनस्पतीची फुले यांचा मनमोहक असा सडा जवळपास ५० ते ६० एकरमध्ये बहरला आहे.

शेकडो प्रकारच्या उपलब्ध रानभाज्याभारंगी, पात्री, कर्टुली, वाघाटी, आळंबी, नाली, अकुरवेल, आधाळी, फिरशी, चिवारी, कचर, लोकेरी, काकडी सारखी गोमटी भाजी या रानभाज्या या परिसरात उपलब्ध आहेत. पावसाळ्यात चार महिने पावसाने गावाचा संपर्क तुटल्यानंतर नागरिकांना या भाज्यांवरच अवलंबून राहावे लागते.

परिसरात वावर असणारे जंगली प्राणीहत्ती, गवे, साळींदर, डुक्कर, भेकर, कोल्हे, लांडगे, वाघ, बिबट्या, ब्लॅक पॅंथर,  काळवीट अशा प्रकारचे प्राणी या भागात दररोज शेतकऱ्यांना दिसतात.

किटवडे परिसरातील औषधी वनस्पतीअमृता, नरक्या, हिरडा, बेहडा, कुंभ, कोकम, दातपडी, रताळे, हाडसांदी, मालेबंद, दूधगर्भणी, शिकेकाई,तमालपत्री, मिरी यासह ३० ते ३५ औषधी वनस्पती सापडतात.

प्रतिचेरापुंजी म्हणून ओळख असलेले पावसाचे गावसमुद्रावरून येणारा पाऊस किटवड्याच्या सड्यावर आदळून पडतो. दररोज १५० ते २०० मि.मी. पाऊस होतो. चेरापुंजी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने किटवडेची ओळख प्रतीचेरापुंजी अशी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर