गेल्या तीन वर्षांपासून येथे ग्रामदेवता भावेश्वरी देवी मंदिराचे बांधकाम युध्दपातळीवर सुरू आहे. ७० वर्षांनंतर हा भावनिक प्रश्न मार्गी लागत असताना ग्रामस्थ ही अटीतटीची निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते.
निवडणुकीत होणारा खर्च टाळून मंदिर उभारण्यासाठी हा पैसा वापरण्याचे ठरले आहे. स्थानिक पुढारी या निर्णयावर ठाम आहेत.
गावात माजी आमदार संजय घाटगे, मंत्री मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक गट तुल्यबळ आहे. समरजित घाटगे गट उभारीला येत आहे. मात्र, पारंपरिक लढती विसरून ग्रामस्थ मंदिर बांधकाम पूर्णत्वास येण्यासाठी बिनविरोधचा आग्रह आहे. सर्वपक्षीय पुढारी, ग्रामस्थ, तरुणाई या मताशी ठाम आहेत. प्राथमिक स्वरुपात झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. माजी सरपंच तानाजी पाटील, नूरमहंमद देसाई,द यानंद पाटील, बाबासाहेब पाटील,धनाजी काटे,विठ्ठल कांबळे, शिवाजी इंगवले, भरत पाटील,राजू राजिगरे, एम. एस .पाटील, मधुकर नाईक व शेखर कांबळे या स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत बिनविरोधवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.