सावरवाडी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाचे सर्व नियमांचे पालन करीत कसबा बीड, बीडशेड, गणेशवाडी या तीन गावांत शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील बाजारपेठा, बाजार, सहकारी संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाच्या नियमांचे कडक पालन करून शनिवारी बंद पाळण्यात आला आहे. बंदमधून दवाखाने, मेडिकल दुकाने, दृूध संस्थांचे दूध संकलन यांना वगळण्यात आले आहे. ग्रामीण बाजारपेठा, दुकाने, व्यापार लाईन, सहकारी संस्था कार्यालये, भाजी मंडई, आदी बंद ठेवण्यात आले होते.
फोटो ओळ = कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बीडशेड येथील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला.