शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कसबा वाळवेत इच्छुकांच्या तयारीवर पाणी

By admin | Published: December 26, 2016 9:46 PM

आरक्षणामुळे मतदारसंघात महिलाराज : दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा हा गट; उमेदवारीसाठीही होणार रस्सीखेच

व्ही. जे. साबळे -- तुरंबे  कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघ दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे. गतवेळी हा मतदारसंघ खुला होता. राष्ट्रवादीतील नाराजांच्या पाठबळावर आणि ‘स्वाभिमानी’शी युती करून काँग्रेसने हा गड जिंकला. सध्या ओबीसी महिला उमेदवारासाठी हा मतदारसंघ आरक्षित झाल्याने अनेकांचे मनसुबे उधळले; परंतु आता आपल्याच कार्यकर्त्यांच्या घरात उमेदवारीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे, तर स्थानिक नेते आपल्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. जिल्हा परिषद ओबीसी, तुरंबे पंचायत समिती ओबीसी, तर कसबा वाळवे पंचायत समिती सर्वसाधारण महिला आरक्षितामुळे या मतदारसंघात महिलाराजच दिसते. माजी आमदार नामदेवराव भोईटे यांनी या गटाचे नेतृत्व केले, तर त्यांच्या स्नुषा सुमित्रा उमेश भोईटे यांनीही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. गतवेळच्या निवडणुकीत काँग्रेसने जिल्ह्यात पहिल्यांदा जि. प. सदस्य हिंदुराव चौगले यांना उमेदवारी देऊन गुगली टाकली. राष्ट्रवादीने कसबा वाळवे गावात अशोकराव फराकटे यांना उमेदवारी देऊन ईर्षा वाढवली. याचवेळी काँग्रेसने चुरस ओळखून आणि या परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद लक्षात घेत संघटनेशी युती केली. या खेळीमुळे काँग्रेसचे हिंदुराव चौगले विजयी झाले. तुरंबे पंचायत समिती मतदारसंघातून संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते अजित पोवार विजयी झाल्याने संघटनेला बळ मिळाले, तर फराकटे यांचा पराभव झाला. मात्र, वाळवे पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक प्रल्हाद पाटील यांच्या थोडक्यात झालेल्या विजयाने सुरू राहिली. आमदार प्रकाश आबिटकर यांना विधानसभेच्या विजयात काँग्रेसची उघड मदत झाली. आमदार सेनेचे असले तरी त्यांना काँग्रेसशी सख्य ठेवावेच लागेल. त्यामुळे थांबा कोणाला म्हणायचे, या धर्मसंकटात ते सापडणार आहेत. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे निकटचे कार्यकर्ते हिंदुराव चौगले हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी रेखा चौगले यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गतनिवडणुकीत मारुतीराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई गटाने चौगले यांना बळ दिले होते. यावेळी तसे होण्याची शक्यता कमी वाटते. कारण बजरंग देसाई गटाने तुरंबेच्या गणेश मंदिरासमोर जोरदार मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन गट बळकट करण्याची भूमिका घेतली आहे. दुसरे प्रबळ उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते मारुतराव जाधव यांच्या स्नुषा वंदना अरुण जाधव यांनी जोरदार तयारी केली आहे. पंचायत समितीच्या सत्तेचा त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी कौशल्याने उपयोग करत आपले वेगळे वलय निर्माण केले. गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जाधव गटाला डावलल्याने त्यांनी हिंदुराव चौगले यांच्या पदरात माप टाकले. यावेळी काँग्रेसने त्यांचा विचार केला नाही, तर त्यांची या मतदारसंघातील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तळाशीसह वरच्या वाड्यात त्यांचा स्वतंत्र गट आहे. २००२ च्या निवडणुकीत माजी उपसभापती अरुण जाधव यांचा किरकोळ मतांनी चौगले यांनी पराभव केला होता, तर २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुमित्रा भोईटे यांनी काँग्रेसच्या रेखा चौगले यांचा पराभव केला होता. स्वाभिमानीने सभापतिपदाचा धरलेला आग्रह काँग्रेसने नाकारला. त्यामुळे तोही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यात राज्यात खासदार शेट्टी भाजपबरोबर आहेत. शिवाय संघटनेची ताकद या परिसरात लक्षणीय आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य चौगले यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीला येथे उमेदवार शोधावा लागणार आहे. अशोकराव फराकटे यांनी सुरुवातीपासून जोरात तयारी ठेवली होती. मात्र, इतर मागास महिला आरक्षण आल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. यावेळी बजरंग देसाई गटाची भूमिका काँग्रेसला विचारात घ्यावी लागेल. या गटाचे जिल्हा सरचिटणीस भरत पाटील यांच्या पत्नी वनिता पाटील, चंद्रेचे माजी सरपंच प्रभाकर पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील, राधानगरी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्या भगिनी अंबिका तहसीलदार, सरिता प. शिंदे हे दावेदार आहेत. शिवाय तिटवेचे किरण नार्वेकर, अर्जुनवाडाचे नामदेव चौगले आपल्या पत्नीसाठी आग्रही आहेत.राष्ट्रवादीकडून सुमन अशोक कांदळकर, मजरे कासारवाडाच्या सरपंच योगिता वारके, रश्मिन नईम अत्तार यांच्यासह अशोकराव फराकटे, चंद्रकांत संकपाळ, अशोक चौगले आपल्या पत्नीसाठी, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील व माजी पं. स. समिती सदस्य स्व. राजमहंमद पाटील यांची स्नुषा आरफिन शाकीर पाटील उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र, प्रत्येकाला ‘बिद्री’च्या चिमणीचे आकर्षण आहे. काँग्रेसने वंदना जाधव यांना नाकारले, तर राष्ट्रवादी हा एक त्यांच्यापुढे पर्याय आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कसबा वाळवे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीच्या लढती अपेक्षित आहेत. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग हा एक भाजपसाठी सक्षम पर्याय होता. मात्र, त्यांची आरक्षणाने गोची झाली आहे. विकास पाटील यांच्या पत्नी सुरेखा, स्वप्नाली कपिल फराकटे, सुजाता गुरव या इच्छुक आहेत. यावेळची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. मात्र, खरी लढत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होण्याची शक्यता अधिक आहे. कसबा वाळवेपंचायत समिती सदस्य अजित पोवार यांनीही सभागृहात एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. आरक्षण आडवे आल्याने त्यांची जि. प. लढविण्याची संधी हुकली आहे. मात्र, ते पत्नी अपर्णा पोवार यांच्यासाठी आग्रही राहणार आहेत.मतदारसंघात कसबा वाळवे, पालकरवाडी, चांदेकरवाडी, ठिकपुर्ली, माजगाव तळाशी, जोगेवाडी, बारडवाडी, चक्रेश्वरवाडी, ढेरेवाडी, कुराडवाडी, फणस, ढेरेवाडी, शेळेवाडी, चंद्रे, अर्जुनवाडा, तिटवे, मजरे कासारवाडा, तुरंबे, कपिलेश्वर या गावांचा समावेश होतो, तर मतदारसंख्या ३४,३३० इतकी आहे.