यावेळी ते म्हणाले, मागील सन २०१९ पेक्षा यावर्षी पूर परिस्थिती अत्यंत भयावह आहे. संपूर्ण जिल्हा पाण्याखाली गेलेला असून
नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे. यावर्षीची ही परिस्थिती पाहता व मागील पूर परिस्थितीचा अनुभव लक्षात घेता यावेळी नदीकाठच्या गावातील सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता संभाव्य धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची विनंती शासनाने केली.
तसेच आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास बांधील असल्याचे त्यांनी पूरग्रस्त कुटुंबीय व पूरबाधित शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत ग्राम विकास अधिकारी श्री. कोळी ,तलाठी दीपक पाटील, शाहू कारखान्याचे संचालक युवराज पाटील, मौजे सांगावचे उपसरपंच संदीप क्षीरसागर, अमर शिंदे, दादा मजले, ॲड. बाबासाहेब मगदूम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
२३ समरजित घाटगे
-
फोटो कॅप्शन : शाहू ग्रुपवर....................... अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी कसबा सांगाव व मौजे सांगाव येथील पूरग्रस्तांची पाहणी करताना. सोबत मान्यवर व ग्रामस्थ.