इचलकरंजी : डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कौशिकी जाधव या विद्यार्थिनीची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ या विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिला सुमारे ८३ लाख रुपयांची शिष्यवृत्ती केंद्र सरकारमार्फत मिळाली आहे.मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या स्वायत्त अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी मशीन टूल्स ॲण्ड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टिस, टूल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मशीन डिझाईन या विषयांचा विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी तिला फायदा झाला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव सपना आवाडे, आर. व्ही. केतकर यांनी तिचे कौतुक केले. कौशिकी हिला प्रा.डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा.डॉ. व्ही. आर. नाईक, प्रा. आर. डी. पाटील, प्रा. एस. ए. सौंदत्तीकर व प्रा. अभय केळकर यांचे मार्गदर्शन लाभले.उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणा-या समकक्ष परिक्षेसाठी डीकेटीई मध्ये वेळोवेळी तज्ञ प्राध्यपकांचे गेस्ट लेक्चरचे आयोजन केले जात असते. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी फायदा होत असतो. कौशिकी जाधव हिच्या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कोल्हापूरच्या कौशिकी जाधवची कौतुकास्पद कामगिरी, शिक्षणासाठी 83 लाखांची शिष्यवृत्ती मिळविली!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:21 AM