शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

केडीसीसीची झेप : ६००० कोटी ठेवींचा टप्पा पार; ऐतिहासिक यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 9:05 PM

देशाचा विकासदर उणे २३ टक्क्यांनी मागे गेला असताना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र शुक्रवारी एक नवी झेप घेतली. बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. बँकेच्या ८२ वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे.

ठळक मुद्देकेडीसीसीची झेप : ६००० कोटी ठेवींचा टप्पा पार; ऐतिहासिक यशअध्यक्ष मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास

कोल्हापूर : देशाचा विकासदर उणे २३ टक्क्यांनी मागे गेला असताना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र शुक्रवारी एक नवी झेप घेतली. बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. बँकेच्या ८२ वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे.

या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इतक्या चांगल्या ठेवी जमा होणे हा बँकेच्या व अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखविलेला विश्वासच आहे, अशा भावनाही यावेळी व्यक्त झाल्या.बँकेने कर्मचाऱ्यांना कोविडसह, अपघाती मृत्यू, इतर व नैसर्गिक मृत्यूबद्दल विमासुरक्षा कवच लागू केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते अध्यक्ष मुश्रीफ यांचा सत्कार झाला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सर्वच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी बँक हिमालयासारखी उभी आहे. जोपर्यंत ठेवी वाढणार नाहीत, तोपर्यंत व्यवस्थापन खर्च कमी येणार नाही, या उद्देशाने मी हे ध्येय ठेवले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने म्हणाले, अध्यक्ष मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन अडीच हजारांवरून दहा हजार रुपये केले. दैनिक वेतनावरील १०० कर्मचाऱ्यांना कायम केले. हक्काच्या रजेचा पगार सुरू केला. कर्मचाऱ्यांना नऊ टक्के बोनस दिला. ६४६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली.आता लक्ष्य १० हजार कोटी ठेवींचेमुश्रीफ म्हणाले, मार्च २०२१ पर्यंत सात आणि मार्च २०२२ पर्यंत दहा हजार कोटी ठेवींचा टप्पा डोळ्यांसमोर ठेवूनच जिद्दीने काम करा. सभासदांचा विश्वास, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जोरावर बँक देशात एक नंबर येईल, याचा मला विश्वास आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ