शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

साताऱ्यातील संग्रहालय जपतेय ऐतिहासिक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 11:12 PM

साताऱ्यातील संग्रहालय जपतेय ऐतिहासिक ठेवा

सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : प्रत्येक शहराला, प्रांताला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्या-त्या भागातील संस्कृती, इतिहासकालीन वस्तूंचा ठेवा जतन व्हावा, यासाठी संग्रहालयांची उभारणी करण्यात आली. साताऱ्यात असलेल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयाला त्यामध्ये जतन करण्यात आलेल्या वस्तूंमुळे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. संग्रहालयांची संकल्पना, संग्रहित केलेला ठेवा व इतिहासाची माहिती देण्याचे काम संग्रहालयामार्फत कित्येक वर्षांपासून सुरू आहे.ऐतिहासिक वस्तूंच्या ठेव्याचा संग्रह करण्याचे आलय म्हणजे संग्रहालय. याच संकल्पनेनुसार पुरातन नाणी, भांडी, शिल्पे, हत्यारे, पुरातन चित्रे आदी वास्तूंचे जतन करण्यास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी संग्रहालयातही इतिहासकालीन अनेक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. या संग्रहालयाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. यामध्ये चार विभाग असून, यामध्ये शस्त्र, अभिलेख, चित्र व वस्त्र विभाग असे चार वेगवेगळे विभाग आहेत. तर दुसरा मराठा आर्ट गॅलरी विभाग आहे.संग्रहालयात असलेल्या अनेक वस्तू आज इतिहासाची साक्ष देत असल्या तरी या संग्रहालयांना भेटी देण्याचे प्रमाण नगण्य आहे. संग्रहालय ही संकल्पना जतन करण्यासाठी शासनाच्या वतीने १८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्त साताऱ्यासह औंध येथील भवानी संग्रहालय सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. जुन्या संग्रहालयाची जागा अपुरी असल्याने शहरातील हजेरी माळ येथे ३० गुंठे क्षेत्रात नव्या संग्रहालयाची उभारणी केली जात आहे. प्रत्येकाने संग्रहालयांना भेट दिली, तरच संग्रहालय संकल्पनेचे जतन होईल.राघोबादादांनी रोवला अटकेपार झेंडा !इ. स. १७५२ मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने अभिमानास्पद अशी घटना घडली. राघोबादादा पेशव्यांनी आताच्या पाकिस्तानात आलेल्या अटकेपर्यंत धडक मारून मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तेथे रोवला. ही घटना मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक मानली जाते. राघोबादादांनी केलेल्या या पराक्रमावर ‘अटकेपार झेंडा रोवणे’ ही म्हण प्रचलित झाली. याच रघुनाथराव म्हणजे राघोबादादा यांची तलवार संग्रहालयात आहे. तलवारीवर सुवर्णाक्षरात ‘रघुुनाथराव’ असे लिहिले आहे.भिंती कापून आणली ‘भित्तिचित्रे’शिवाजी संग्रहालय १३ जानेवारी १९७० मध्ये नागरिकांसाठी खुले झाले. या संग्रहालयात जतन करण्यात आलेल्या भित्तिचित्रांना विशेष महत्त्व असून, त्याला कारणही तसेच आहे. जयराम स्वामींचे वडगाव येथील मठात असलेली भित्तिचित्रे भिंती कापून सुरक्षित काढण्यात आली व त्यांचे साताऱ्यातील संग्रहालयात जतन करण्यात आले. अशा प्रकारे भित्तिचित्रे जतनीकरणाचा भारतातील हा पहिलाच प्रयोग असावा. याचे श्रेय प. ना. पोतदार, मधुकर इनामदार व तत्कालीन सहायक अभिरक्षक मधुकर इनामदार यांना जाते.‘जिज्ञासा’कडून आज अभ्यास सहलगेल्या काही वर्षांपासून जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या पुढाकाराने १८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साताऱ्यात देखील साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात गुरुवारी सकाळी १०.३० वाजता अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने केले आहे.