शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चित्र, चरित्रातून सांस्कृतिक ठेवा - किरण शांताराम 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 4:27 AM

भारतीय चित्रपटसृष्टीत कोल्हापूरने मोलाचे योगदान दिले आहे. याच मातीतले नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या चित्र आणि चरित्र या आत्मचरित्रातून नाट्य आणि सिनेसृष्टीचा इतिहास पुनरुज्जीवित करण्यात आला आहे.

कोल्हापूर - भारतीय चित्रपटसृष्टीत कोल्हापूरने मोलाचे योगदान दिले आहे. याच मातीतले नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या चित्र आणि चरित्र या आत्मचरित्रातून नाट्य आणि सिनेसृष्टीचा इतिहास पुनरुज्जीवित करण्यात आला आहे. त्याच्या पुनर्प्रकाशनाद्वारे हा ठेवा नव्या पिढीसाठी उपलब्ध झाला आहे, असे मत ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम यांनी शनिवारी व्यक्त केले.गेली अनेक वर्षे आऊट आॅफ प्रिंट असलेल्या या पुस्तकाचे चित्रपती व्ही. शांताराम फौंडेशनने पुनर्मुद्रण केले आहे. या पुस्तकाचे शनिवारी राम गणेश गडकरी हॉलमध्ये व्ही. शांताराम फौंडेशन, पेंढारकर कुटुंबीय व कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या वतीने प्रकाशन करण्यात आले. राम देशपांडे म्हणाले, या आत्मचरित्राला लेखनिक म्हणून काम करताना मला बाबूराव पेंढारकर यांचा सहवास लाभला. लेखनाचा निर्णय झाला तेव्हा मी एक रुपयाही घेणार नाही असे सांगितले; मात्र त्यांनी स्वत:हून मला एक तासाला ५ रुपये आणि रजा असेल तेव्हा अडीच रुपये असे मानधन ठरवले. सकाळी आठ ते दुपारी एक आणि दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे काम चालायचे. या काळात ते कोणाचीही भेट घेत नसत. अत्यंत शिस्तप्रधान अशी त्यांची जीवनशैली होती.टोपीतून वडिलांचा आशीर्वादवडील व्ही. शांताराम यांची आठवण सांगताना किरण शांताराम म्हणाले, मी कधीही टोपी वापरत नाही. किंबहुना ते आवडत नसे; पण अण्णा आजारी पडले तेव्हा त्यांनी मला ‘तू कोणत्याही चांगल्या कामाला अथवा समारंभाला जाशील तेव्हा माझी टोपी घालावीस अशी माझी इच्छा आहे,’ असे सांगितले. मी याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, या टोपीच्या रूपाने माझा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहील. या घटनेनंतर मी टोपी घालायला सुरुवात केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcinemaसिनेमा