शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

केळोशी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

By admin | Published: March 07, 2016 10:38 PM

काम बंद पाडले : प्रकल्पग्रस्त दाखले, जमिनी त्वरित द्या; अन्यथा काम करू देणार नाही

धामोड : धरणासाठी वडिलोपार्जित मिळकतीचा सातबारा कसलाही विचार न करता आपल्या स्वाधीन करत संसारावर पाणी ओतले. त्यावेळी शासन प्रकल्पात गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यात आम्हाला प्रकल्पग्रस्त दाखले व जमीन देईल असे वाटले होते; पण १२ वर्षांचा कालखंड लोटला, तरी आमची दखल कोणीच घेण्यास तयार नाहीत. याच उद्वेगातून रविवारी केळोशी बुद्रुक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी धरणस्थळावर जाऊन १२ वर्षांनंतर सुरू झालेले काम बंद पाडले. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे बंद झालेले रस्ते करून दिल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही, असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारा दिला आहे.निवेदनात म्हटले आहे, केळोशी बुद्रुक प्रकल्पाच्या कामाला २००१ मध्ये सुरुवात झाली. प्रकल्पाचा मूळ खर्च १0 कोटी ७३ लाख ८५ हजार २५ रुपये इतका निश्चित करून कामाला सुरुवात झाली. यातील भूसंपादनासाठीचे एक कोटी ८४ लाख ४२ हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले; पण त्यानंतर भक्कम अशा स्वरूपाचा निधी न मिळाल्याच्या कारणास्तव प्रकल्पाचे काम १२ वर्षे रेंगाळले. त्यामुळे धरणाचा खर्च २५ कोटींच्या घरात गेला आहे. आता या धरणाला निधी प्राप्त झाला असून, जवळपास १२ वर्षांनंतर कामाला सुरुवात झाली आहे; पण असे असले तरी या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, अशा बहुतांशी शेतकऱ्यांना अद्याप कोणताच मोबदला मिळालेला नाही. पैकी काही शेतकऱ्यांना पर्यायी जमीनही दिलेली नाही. एवढेच नाही तर साधा प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखलाही शासनाने देण्याचे धाडस दाखविले नाही. आमच्या या मागण्यांसंदर्भात राधानगरीचे तहसीलदार यांना मा. जिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी बैठकीच्या तारखा देऊ नही या बैठका घेण्यासाठी कार्यकारी अभियंता अथवा तहसीलदार राधानगरी यांना वेळ मिळत नसावा, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब आहे. वरील सर्व बाबी आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळविल्या असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे.प्रकल्पग्रस्तांंचे रखडलेले पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप, प्रकल्पामुुळे बंद झालेले शेतकऱ्यांचे रस्ते, आदी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय धरणाचे काम पूर्ववत सुरू करू देणार नाही, असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी गणपती सखाराम पाटील, एम. के . पाटील, महिपती पाटील, एकनाथ पाटील, विष्णू पाटील, कृष्णात पाटील, गणपती गोविंदा पाटील, सदाशिव पाटील, दत्तात्रय पाटील, जोतिराम चौगले, राजाराम पाटील, मारुती चौगले, आदी शेतकरी उपस्थित होते.दृष्टिक्षेपात धरणकामास प्रारंभ - मे २००१, साठवण क्षमता - ५६०३.२२५ सहस्त्र घनमीटर, प्रकल्पाची लांबी ५५० मीटर, सांडवा - ७४ हेक्टर, लाभ क्षेत्र - ६२१ हेक्टर, शेतकरी बुडीत जमीन ८.५० हेक्टर, वन विभागाची बुडीत जमीन १३.८४ हेक्टर.जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही - गणपती पाटील, प्रकल्पग्रस्त