सडोली (खालसा) : गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकाप, काॅंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या केराबाई नारायण वरूटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. बी. नांगरे यांनी काम पाहिले.
सरपंच पदासाठी आरक्षित उमेदवार नसल्याने येथील सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले होते. या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण बदलण्यात आले. शुक्रवारी निवडणूक विभागाने सरपंच पदासाठी कार्यक्रम घेतला, यामध्ये केराबाई वरुटे या एकमेव उमेदवार असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते नूतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, शामराव मुळीक, रघुनाथ मिठारी, कृष्णात बुडके, विवेक मिठारी, गोविंद मेटील, साताप्पा मिठारी, प्रतीक मुळीक, उपसरपंच शुभांगी मिठारी, बाबासाहेब मिठारी, ग्रामसेविका. दीपा यादव, विशाल यादव, सायली मेटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
२७ केराबाई वरुटे