कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. केशव राजपुरे यांची भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांनी महिन्यापूर्वीच अधिविभाग प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या निवडीने रिक्त असणाऱ्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र प्रा. राजपुरे यांना बुधवारी विद्यापीठ प्रशासनाकडून प्राप्त झाले. या नियुक्तीमुळे त्यांचे नाव विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या सभासद यादीमध्ये गेले आहे.
डिसेंबरअखेरीस अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी प्लॉस बायोलॉजी या नियतकालिकात जगातील शीर्ष दोन टक्के शास्त्रज्ञांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यांत प्रा. राजपुरे यांचा पदार्थ संशोधकांच्या यादीत समावेश होता. त्यांचे मूळ गाव बावधन (ता. वाई) आहे. त्यांनी कौशल्याच्या आणि अनुभवाच्या जोरावर भौतिकशास्त्रामध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे.
फोटो (०३०२२०२१-कोल-केशव राजपुरे (विद्यापीठ)