शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Keshavrao Bhosle Theatre Fire: कोल्हापूरचा ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा उद्ध्वस्त, नाट्यगृह परिसरात संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 12:22 PM

केशवराव भोसले यांच्या स्मृती प्रदर्शनाची तयारी झाली आणि..

कोल्हापूर : करवीरनगरीचे भूषण असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरूवारी रात्री शाॅर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. आग एवढी प्रचंड होती की यामध्ये निम्मे नाट्यगृह जळून खाक झाले. आगीच्या या आक्राळविक्राळ रूपाने अनेकांच्या पोटात खड्डाच पडला. शर्थीच्या प्रयत्नांनी सुदैवाने दर्शनीभाग शाबूत राहिला असला तरी नाट्यगृहाचे संपूर्ण छप्पर आणि आतील संपूर्ण खुर्च्यांसह विद्युत आणि अन्य यंत्रणा निकामी झाली. केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या रात्री झालेल्या या दुर्घटनेमुळे कोल्हापूरकर हळहळले. परंतु राजर्षी शाहू महाराजांचा हा वारसा पुन्हा एकवार उभारू, असा निर्धारही यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. सुदैवाने नाट्यगृहात कोणताच सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने संभाव्य धोका टळला. दरम्यान नाट्यगृहाच्या १०० मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.रात्री साडेनऊच्या सुमारास नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूने आग लागल्याचे खाऊगल्लीतील एका विक्रेत्याच्या लक्षात आले. त्याने आत येऊन परिस्थिती पाहिली. इतक्यात तिथे असलेल्या वातानुकुलन यंत्रणेतील गॅस सिलिंडरचा स्फाेट झाला आणि आग भडकली. याच ठिकाणी कुस्तीच्या मॅट असल्याने त्यांनीही पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हे समजताच अशोक पोवार, रमेश बाणदार यांनी आत धाव घेतली. अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच सर्व केंद्रांवरील पाण्याचे बंब नाट्यगृहाकडे निघाले. इतक्यात बाराईमाम तालमीचे कार्यकर्तेही मदतीसाठी धावले.नाट्यगृहाच्या उजव्या बाजूंनी पहिल्यांदा बंबांनी पाणी मारून आग विझवण्यास सुरूवात केली. पाठीमागून आलेल्या बंबांनी मुतारीकडील बाजूकडून पाण्याचा मारा सुरू केला. परंतु पाठीमागून जोरदार वारे असल्याने आणि लाकडी साहित्यामुळे आग भडकत निघाली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परंतु अशातच जिन्यावरील पत्रे पडायला सुरूवात झाली. त्याचा धाडधाड आवाज येऊ लागला. कौलांच्या खाली संपूर्ण लाकडी रिपा असल्याने ही आग आणखी भडकली. त्याचे निखारे नाट्यगृहाच्या गॅलरीत पडले आणि फोमच्या खुर्च्यांनीही पेट घेतला. वरील खुर्च्यांची आग खालीही पसरली आणि खालूनही आगडोंब उसळला. महापालिकेच्या यंत्रणेसोबत या ठिकाणी सचिन चव्हाण, दुर्वास कदम यांच्यासह कार्यकर्तेही मदतीस आले. काहींनी या ठिकाणच्या व्हीआयपी रूममधील सोफे, खुर्च्या बाहेर काढून ठेवल्या.दोन्ही बाजूंनी पाणी मारून आग विझवण्याचे शर्थीच प्रयत्न सुरू असले तरी वाऱ्यामुळे भडकणारी आग विझविणे अशक्यप्राय वाटू लागले. अशातच नाट्यगृहाच्या पुढील बाजूचे छप्परही पेटायला सुरूवात झाली. आता संपूर्ण इमारतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार अशी भीती वाटू लागली परंतु पाऊण तासांत या ठिकाणी टर्न टेबल लॅडर आणण्यात आले. त्याच्या शिड्या उलगडून पाण्याचा फवारा उंचावरून छपरावर मारण्यास सुरूवात झाली आणि त्यानंतर नाट्यगृहाचा दर्शनी भाग बचावला.

केशवराव भोसले यांच्या स्मृती प्रदर्शनाची तयारी झाली आणि..केशवराव भोसले यांची आज, शुक्रवारी जयंती. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पेंढारकर कलादालनामध्ये ठेवण्यात आले होते. त्याच ठिकाणी सकाळी ९ वाजता भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार होते तसेच सायंकाळी साडेसहा वाजता ‘वेध एका संगीतसूर्याचा’ आणि शनिवारी ‘मी केशवराव’ या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले हाेते. प्रशांत जोशी, मिलिंद अष्टेकर यांच्यासह येथील कर्मचारी आजच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाची तयारी करून नऊच्या सुमारास येथून निघून गेले होते आणि अर्ध्या तासांत नाट्यगृहाला आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची कटू बातमी या सर्वांना ऐकावी लागली.

घटनाक्रमरात्री ९.३० वाजता : नाट्यगृहाला शाॅर्टसर्किटमुळे आग लागली९.४५ : अग्निशमन दलाला वर्दी मिळाली.१०.०० वाजता : आग विझवण्यास सुरूवात१०.१५ वाजता : टर्न टेबल लॅडर पोहोचले.१०.३० वाजता : लॅडरच्या माध्यमातून आग विझवण्यास सुरूवात१०.४० वाजता : विमानतळाचा मोठा अग्निशमन बंब दाखल१२.०० वाजता : आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश१२.३० वाजता : आगीमुळे धुराचे लोट उसळल्याने परिसर काळवंडला..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग