शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

‘केशवराव’चा प्रस्ताव रेंगाळला मंजुरीची प्रतीक्षा : जीएसटी’ने वाढला दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:45 AM

येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विकासाचा दुसरा टप्पा मंजुरीअभावी रेंगाळला आहे. गतवर्षी लागू झालेल्या जी.एस.टी.मुळे नाट्यगृहासाठी येणाऱ्या खर्चात दीड कोटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून सुधारित प्रस्ताव शासनाकडे; ‘

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विकासाचा दुसरा टप्पा मंजुरीअभावी रेंगाळला आहे. गतवर्षी लागू झालेल्या जी.एस.टी.मुळे नाट्यगृहासाठी येणाऱ्या खर्चात दीड कोटीने वाढ झाली आहे. सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून दोन महिने झाले तरी त्यावर शासनाकडून शिक्कामोर्तब झालेले नाही.

महाराष्ट्राच्या संगीतनाट्य परंपरेला समृद्ध करणारे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जपलेले कलासक्तपण. या नाट्यगृहाचे २०१४ साली नूतनीकरण सुरू झाले आणि दीड-पावणे दोन वर्षात नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाचे पहिल्या टप्प्यातील नूतनीकरण पूर्ण झाले. गेल्या काही वर्षांत कोणत्याही वादाविना पार पडलेला हा कोल्हापुरातील पहिलाच प्रकल्प म्हणावा लागेल. त्यासाठी १० कोटींचा निधी खर्च झाला.

नूतनीकरणाच्या दुसºया टप्प्यात परिसराचे सुशोभीकरण, ब्लॅक बॉक्स, कॅँटीन, कंपाउंड वॉल, पार्किंग, लॉन अशी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्वी ८ कोटी ३९ लाखांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र विभागीय आयुक्तांनी काही शंका उपस्थित करून सूचना केल्या. त्यानुसार छाननी करण्यात आली. दरम्यान, गतवर्षी जुलैमध्ये जी.एस.टी. लागू झाल्याने पुन्हा नव्याने प्रस्तावाचे अंदाजपत्रक तयार करावे लागले. त्यात आता दीड कोटीची वाढ झाली असून, हा प्रस्ताव ९ कोटी ९० लाखांवर गेला आहे. वरील सुधारित प्रस्ताव महापालिकेने दोन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून तो विभागीय आयुक्तांकडे जातो.त्यांच्या मंजुरीनंतर पुढे शासनाकडे पाठविला जातो. मात्र, या प्रस्तावाचे पुढे काय झाले, हे महापालिकेला माहीत नाही; किंबहुना महापालिकेकडून त्याचा पाठपुरावाही करण्यात आलेला नाही.त्यामुळे नाट्यगृहाचा दुसऱ्या टप्प्यातील विकासाचा प्रस्ताव रेंगाळला आहे.पुतळा नाही, प्रवेशद्वारावर नावही नाहीमहापालिकेने नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी परिसरात केशवरावांचा पुतळा उभारण्याचे जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात ते शक्य झाले नाही; पण दुसºया टप्प्यातही तसा प्रस्ताव नाही. केशवराव भोसले या नावाचे काय कर्तृत्व आहे, त्याची माहिती नाही.ही इमारत नेमकी कशाची आहे, हे कळण्यासाठी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावरच नावाचा मोठा फलक लावणे अपेक्षित आहे.केशवरावांचे चित्र छतावर, महापुरुषांकडे पाठपहिल्या टप्प्यातील नूतनीकरणानंतर ज्यांच्या नावे हे नाट्यगृह आहे, त्या संगीतसूर्य केशवराव भोसलेंचे चित्र थेट छतावरच लावण्यात आले आहे. खुर्चीत बसून कंटाळलेल्या माणसाने मान वर केल्यानंतरही दिसू नये, अशा पद्धतीने हे चित्र लटकावले आहे.

दुसरीकडे, कोल्हापूरच्या नाट्यपरंपरेला ज्यांनी सोनेरी पान दिले, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बालगंधर्व यांच्यासह दिग्गज व्यक्तींची चित्रे प्रेक्षागृहात मागच्या भिंतीला लावली आहेत. आलेला प्रेक्षक थेट खुर्चीत बसतो. त्याने मागे वळून कोणते चित्र कोणाचे आहे, हे पाहायचे काही कारणच नाही. गेल्या अडीच वर्षांत यावर कोणत्याही नाट्यकर्मींनी किंवा रसिकांनी आक्षेप नोंदविला नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. 

जीएसटी लागू झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार नाट्यगृहाचा सुधारित प्रस्ताव तयार करून तो दोन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. प्रस्ताव कुठल्या टप्प्यात आहे, हे अद्याप समजलेले नाही.- अनुराधा वांडरे,(प्रकल्प अधिकारी)